Maruti Suzuki S-Presso Discount Offer : दिग्गज कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स घेऊन येत असते. नुकतीच कंपनीने काही डीलर्स कंपनीच्या रेंजमधील निवडक मॉडेल्सवर प्रचंड प्रमाणास डिस्काऊंट ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. Arena आणि Nexa शोरूममध्ये उपलब्ध, या ऑफर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत या स्वरूपात ग्राहकांना मिळू शकतात. पण, मारुती S-Presso या कारवर नेमकी किती ऑफर मिळतेय? या कारची वैशि,्ट्य नेमकी काय आहेत? आणि कारचं इंजिन तसेच खरी किंमत किती असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


कारवर किती मिळतंय डिस्काऊंट?


उत्पादन वर्ष 2023 S-Presso एकूण 50,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये 30,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. उत्पादन वर्ष 2024 मॉडेलमध्ये 15,000 रुपयांची रोख सवलत, 23,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.


कारची किंमत आणि इंजिन कसं आहे?


Maruti Suzuki S-Presso ची भारतात एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार तुम्हाला सात कलरमध्ये Std, LXi, VXi आणि VXi+ आणि या चार प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. कारला उर्जा देण्यासाठी, यात 1.0-लिटर, K10 पेट्रोल इंजिन मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स युनिटच्या पर्यायासह खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय, ग्राहक सीएनजी व्हर्जनची निवड करू शकतात.


कारचा मायलेज किती आहे? 


S Presso च्या पेट्रोल MT ला 24.12 kmpl (STD, LXi), 24.76 kmpl (VXi, VXi+) मायलेज मिळते, तर, पेट्रोल AMT ला 25.30 kmpl [VXi(O), VXi+(O)] आणि सीएनजीमध्ये 32.73 किमी/किलो मायलेज उपलब्ध आहे. 


कारची वैशिष्ट्ये काय? 


या कारच्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात Apple CarPlay आणि Android Auto सह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो आणि कीलेस एंट्री यांचा समावेश आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), आणि EBD सह ABS यांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


New Kia Sonet Facelift : हायटेक सेफ्टी फीचर्स, 6 एअरबॅग्ज आणि ADAS सिस्टम; सात लाखात लाँच झाली Kia Sonet Facelift!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI