New Kia Sonet : कियाने आपली प्रसिद्ध कॉम्पॅक्ट (kia sonet) एसयूव्ही किआ सोनेट आज नव्या स्टाईलने भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. आकर्षक लूक, जबरदस्त फीचर्स आणि एडीएएस टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनसह येणारी ही एसयूव्ही एकूण 19 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यात 25 सेफ्टी फीचर्स, 70 कनेक्टेड फीचर्स आणि 15 हाय सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.


लूक आणि डिझाइन कशी आहे?



नवीन किआ सोनेटच्या लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर ते सध्याच्या मॉडेलसारखेच आहे. सर्वात मोठा बदल त्याच्या मोठ्या एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) च्या स्वरूपात आहे. याशिवाय फ्रंट बंपर आणि स्किड प्लेट्सही रिडिझाइन करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये हॉरिजंटल माउंटेड एलईडी फॉग लाइट्स देण्यात आले आहेत. कंपनीने यात 16 इंचाच्या नवीन डिझाइन अलॉय व्हील्सचा समावेश केला आहे.


मागील बाजूस एसयूव्हीमध्ये एक मोठा एलईडी रियर लाइटबार देण्यात आला आहे जो एसयूव्हीच्या दोन्ही सी आकाराच्या टेललाइट्सला एकमेकांशी जोडतो. याशिवाय रिअर बंपर आणि रूफ माउंटेड स्पॉइलरही रिडिझाइन करण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणेच टेक-लाइनला जीटी आणि एक्स-लाइनपेक्षा थोडे चांगले ट्रीटमेंट देण्यात आले आहे. इतर बाबींमध्ये ही एसयूव्ही आधीच्या मॉडेलसारखीच दिसते. सोनेट फेसलिफ्ट 8 मोनोटोन, दोन ड्युअल टोन आणि एक मॅट फिनिश पेंट शेडमध्ये उपलब्ध आहे, सेल्टोस प्यूटर ऑलिव्ह कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.


इंजिन आणि परफॉर्मन्स कसा आहे?


कंपनीने नवीन सोनेट फेसलिफ्टच्या इंजिन यंत्रणेत कोणताही बदल केलेला नाही. हे आधीप्रमाणेच तीन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आले आहे. 1.2 लीटर, 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन 83 एचपी जनरेट करते जे केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. दुसरा पर्याय म्हणजे 1.2 लिटर, 3 सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन जे 120 एचपीची पॉवर जनरेट करते आणि तिसरा पर्याय म्हणजे 1.5 लीटर चार सिलिंडर डिझेल इंजिन जे 116  एचपीची पॉवर जनरेट करते. टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि आयएमटी गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. याशिवाय हे दोन्ही इंजिन 7-स्पीड ड्युअल क्लच आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ऑप्शनसोबत येतात.


इतर महत्वाची बातमी-


Upcoming SUVs: येत्या काही आठवड्यात लाँच होणार 4 नवीन SUV, जाणून घ्या प्रत्येक मॉडेलचे खास फिचर्स!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI