Discovery Sport 2024 Launched:  Jaguar Land Rover (JLR) इंडियाने लैंड रोवर डिस्कवरी (Discovery Sport 2024 Launched) स्पोर्ट 2024 मॉडल हे भारतात लाँच केले आहे. ही 7 सीटर SUV 67.90 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आली आहे. या SUV मध्ये काही (Auto News) अपडेट्स करण्यात आले आहेत. Jaguar Land Rover च्या Discovery Sport 2024  मध्ये नवे अपडेट्स काय असणार आहे?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.


11.4-इंच टचस्क्रीन आणि 3D व्ह्यू कॅमेरा


नवीन एलईडी हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि 19-इंच अलॉय व्हील्ससह शायनिंग फिनिशमध्ये पुन्हा डिझाइन केलेलेआहे. डायनॅमिक SE ट्रिममध्ये उपलब्ध नवीन मॉडेल दोन इंजिन पर्यांयसह, 11.4-इंच टचस्क्रीन आणि 3D व्ह्यू कॅमेरासह येतो. 


2024 डिस्कवरी स्पोर्ट फीचर्स



नवीन लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्टच्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास त्यात मोबाइल कनेक्टिव्हिटी, अलेक्सा व्हॉईस असिस्ट, नवीन 11.4-इंच PV प्रो इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन गियर सिलेक्टर, तिसऱ्या रोसाठी क्लायमेट कंट्रोल, 3D सराउंड व्ह्यू कॅमेरा आहे. ClearSight Ground View आणि Rear View Mirror सारखी फिचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय लेदर इंटीरियर, वायरलेस चार्जिंग आणि 2 यूएसबी-सी प्रकारचे चार्जर यासारखी फीचर्सही या कारमध्ये उपलब्ध आहेत.


2024 डिस्कवरी स्पोर्ट इंजिन ऑप्शन


अपडेटेड डिस्कव्हरी स्पोर्ट दोन इंजिन पर्यायांसह येतो, पहिले 2.0-L पेट्रोल इंजिन जे 245bhp ची कमाल पॉवर आणि 365Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे म्हणजे, 2.0-L डिझेल इंजिन उपलब्ध आहे, जे 201bhp ची कमाल पॉवर आणि 430Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी, दोन्ही इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहेत आणि ही SUV ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टमसह देखील येते.


2024 डिस्कवरी स्पोर्ट कोणत्या कारला देणार टक्कर


ही SUV लक्झरी सेगमेंटमध्ये प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगल्या किमतीत लाँच करण्यात आली आहे.  लक्झरी कार BMW X3, Audi Q5, Volvo XC60 आणि Mercedes-Benz GLC या कारला टक्कर देणार आहे. त्यामुळे लक्झरी कार वापरणाऱ्यांना आता नेमकी कोणती कार खरेदी करावी, यासाठी थोडा विचार करावा लागणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-



 

 

 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI