Skoda Car : सध्या अनेकजण गाड्यांमधील खास (Car) फिचर्स आणि गाड्यांच्या कंपन्यांची (Skoda Car Sales 2023 In India) चलती पाहून गाड्या खरेदी करत असतात. त्यात (Car Sales 2023 In India) सध्या  भारतीय स्कोडा गाड्यांना (Skoda)  जास्त पसंती देत असल्याचं दिसत आहे. एवढेच नव्हे तर या कंपनीमध्ये बनणाऱ्या सगळ्या गाड्यांना जागतिक स्तरावरसुद्धा पसंती मिळत आहे. सगळ्य़ांना पसंतीस पडलेल्या स्कोडाच्या गाड्यांची मागील वर्षी तुफान विक्री झाली. 365 दिवसांत लाखांपेक्षा जास्त गाड्यांची विक्री झाल्याचं कंपनीने सांगितलं आहे.


स्कोडाने विकल्या लाखाहून अधिक गाड्या


स्कोडाने 2023 मध्ये मार्केटमध्ये 101,456 गाड्या विकल्या.  2022 ची विक्री बघायला गेलो तर 2024  आकडा खूप जास्त असल्याचं समजून आले आहे. वर्ष दर वर्षाच्या हिशोबाने कंपनीने निर्यातीमध्ये  32 टक्के वाढ केली आहे. अनेक फिचर्समुळे या कंपनीने मार्केटमध्ये तिचं नाव बनवले आहे. फक्त डिसेंबर महिन्यामध्ये कंपनीने 10000 पेक्षा अधिक गाड्यांची विक्री केली होती. 


कंपनीने केलेल्या सर्वोत्कृष्ट कामामुळे आणि गाडीतून मिळणाऱ्या चांगल्या फिचर्समुळे ही कंपनी सध्या चर्चेत आहे. फक्त भारतातच नाहीतर जागतिक स्तरावरदेखील या गाड्यांना पसंती मिळत आहे. याशिवाय या कंपनीच्या इतर गाड्यांची मागणीसुद्धा खूप जास्त आहे. त्यामध्ये ऑडी ,पोर्शे आणि लेम्बोर्गिनी समावेश आहे. विकण्यात आलेल्या सगळ्या गाड्या MQB-AO-IN प्लॅटफॉर्मवर तयार केल्या होत्या. 2022 पेक्षा 2023 मध्ये या गाड्या जास्त प्रमाणात विकण्यात आल्या आहेत. 


स्कोडाच्या ऑटो मॅनेजिंग डायरेक्टर काय म्हणाले?


स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडियाचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ ने सांगितले आहे की,  2023 मध्ये अनेक गाड्या विकल्या गेल्या. किंमत आणि गाड्यांमध्ये देण्यात आलेले फिचर्स पाहून अनेकांनी या गाड्या खरेदी केल्या. येत्या वर्षातदेखील आम्ही सगळे असेच नवनवे फिचर्स असणाऱ्या गाड्यांवर काम करत आहोत. या फिचर्समुळे गाड्यांची विक्री आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. फक्त भारतातच नाहीत जगात स्कोडाच्या गाड्या जास्तीत जास्त कशा खरेदी केल्या जातील?, याकडे आमचं लक्ष असेल. तुम्हीदेखील गाडी घेण्याचा विचार करत असाल तर या कंपनीच्या गाड्या तुमच्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन ठरू शकते.


इतर महत्वाची बातमी-


Tesla in India: भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा प्लान; प्लांट, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरही निर्मिती करणार



 

 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI