Car Care Tips : नवीन कार खरेदी केल्यानंतर लोक सोशल मीडियावर (Social media) फोटो पोस्ट करतात हे तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल. आणि फोटोसोबत कॅप्शन मध्ये लिहितात की, "आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य. अनेकांसाठी गाडी ही कुटुंबातील सदस्यासारखी असते. विशेषत: ज्यांना ऑटोमोबाईल आवडतात त्यांच्यासाठी. सहसा लोक एकतर त्यांच्या पालकांसाठी कार खरेदी करतात किंवा स्वत: साठी नवीन मॉडेल खरेदी करतात.  नवीन कार खरेदी करणाऱ्यांना कार मेंटेनन्सच्या कामाबद्दल फारशी माहिती नसते. अनेक जण बेसिक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेकदा कारमध्ये समस्या निर्माण होतात आणि त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. जर तुम्ही नवीन कार खरेदी केली असेल आणि अशा टिप्स शोधत असाल ज्यामुळे तुमची कार चांगल्या स्थितीत राहील. तर आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत ज्या सोप्या आणि फायदेशीर आहेत.


टायरची हवा चेक करत रहा... 



कारचे टायर हा एक भाग आहे. विशेष म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा घटक असूनही टायर हा कारचा सर्वात दुर्लक्षित भाग आहे. परंतु, या निष्काळजीपणामुळे टायर लवकर खराब होऊ शकतात आणि त्यांचे आयुष्य कमी होऊ शकते. त्यामुळे टायरमध्ये हवा किंवा नायट्रोजनचे सांगितलेले प्रमाण ठेवणे नेहमीच महत्त्वाचे असते. स्थानिक गॅरेज किंवा पेट्रोल पंपांवर एअर फिलिंग मशीन असतात, आपण पोर्टेबल एअर पंप ऑनलाइन खरेदी आणि वापरू शकता.


इंजिन ऑईल बदलत रहा...


कारमध्ये अनेक लहान मोठी यंत्र असतात. सगळीच यंत्र एकमेकांवर अवलंबून असतात. ही यंत्र नीट
 राहण्यासाठी लुब्रिकेशन फार महत्वाचे आहे. पॉवरट्रेनमधील महत्वाच्या भागाचं कार्य नीट सुरु ठेवण्यासाठी इंजिन ऑईल बदलण्याची गरज असते. साधारणत: दर दहा हजार किलोमीटर कार धावल्यानंतर किंवा वर्षातून एकदा इंजिन ऑईल बदलण्याची आवश्यकता असते.


बॅटरीची काळजी घ्या.
 


बॅटरी हा कारचा महत्वाचा भाग असतो. त्यामुळे बॅटरीची काळजी घेणंदेखील तितकंच महत्वाचं असतं. वेळोवेळी बॅटरी स्वच्छ केल्याने त्याचे आयुष्य वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर हे बॅटरी टर्मिनल्सवरील गंज काढून टाकते आणि सुरळीतपणे काम करण्यास मदत करते.



गाडी स्वच्छ ठेवा.



वारंवार कार धुण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपण घरी मायक्रोफायबर कापड वापरून कार स्वच्छ ठेवू शकता. याशिवाय साध्या व्हॅक्युम क्लीनरचा वापर करून कारचे इंटिरिअर स्वच्छ ठेवणे सोपे आहे.  बाहेरील स्वच्छतेमुळे कार चमकदार आणि चांगली दिसण्यास मदत होते. त्याचबरोबर यामुळे गाडीचा रंग बराच काळ चांगल्या स्थितीत राहतो. 


इतर महत्वाची बातमी-


Google Pay Extra Charge : Google Pay वर आता मोबाईल रिचार्जसाठी मोजावे लागणार एक्स्ट्रा फी, जाणून घ्या तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI