Upcoming Cars in 2024: नवीन वर्ष 2024 सुरु होण्यास अद्याप एक महिना बाकी आहे. हे नवीन वर्षात देशांतर्गत ऑटो मार्केटसाठी खूप मजेदार असणार आहे. कारण, अनेक उत्कृष्ट उत्पादने या नवीन वर्षात लाँच केली जाणार आहेत. नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी पुढील वर्षी अनेक पर्याय घेऊन येणार आहे, ज्यामध्ये नवीन SUV आणि हॅचबॅकपासून अनेक महत्त्वाचे लॉन्च दिसून येतील. दरम्यान, आम्ही अशाच 5 नवीन गाड्यांबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये काही नवीन पिढीच्या बदलांसोबतच इतरही काही बदल पाहायला मिळतील.


नवीन Hyundai Creta


नवीन क्रेटा इतर बाजारपेठांसाठी क्रेटा फेसलिफ्ट सारखी नसेल, कारण भारतात ती वेगवेगळ्या स्टाइलसह विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. नवीन क्रेटा नवीन डिझाइनला सपोर्ट करेल. जी एका मोठ्या जागतिक Hyundai SUV सारखी असेल. सध्या चर्चा त्याच्या नवीन पॉवरट्रेन आणि इंटीरियरबद्दल असणार आहे. नवीन क्रेटामध्ये 360 डिग्री कॅमेरा, ADAS आणि 18 इंच चाके यांसारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळणार आहेत. 


नवीन मारुती स्विफ्ट


नवीन मारुती स्विफ्ट ही नवीन वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल होणार आहे. या गाडीत नवीन इंजिनवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. नवीन स्विफ्ट अधिक दर्जेदार असणार आहे. ज्यात पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक केबिन डिझाइन देखील असणार आहे. अधिक प्रीमियम बनवण्यासाठी त्याची शैली बदलली जाईल. याशिवाय नवीन तीन सिलेंडर पेट्रोल इंजिनमुळं इंधन कार्यक्षमता आणखी वाढेल. 


टाटा कर्व


भारतातील कर्व्हची सुरुवातीची एंट्री EV स्वरूपात असेल, ज्याला 400-500 किमी दरम्यान चांगली रेंज मिळेल. याशिवाय, यात अनेक डिझाईन्स पाहायला मिळणार आह. कर्व ही एक मोठी एसयूव्ही कूप आहे, जी नेक्सॉनच्या वर स्थित असेल. ही अशा प्रकारची पहिली SUV कूप असणार आहे. इंटीरियर वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार आहे. टाटा मोटर्सची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक ऑफर असण्याव्यतिरिक्त ते Nexon EV पेक्षा अधिक शक्तिशाली असेल.


महिंद्रा थार 5-डोअर


महिंद्रा थार 5-डोअर अखेर 2024 मध्ये येत आहे. थार 5-डोअर अधिक आलिशान असेल आणि सध्याच्या थारपेक्षा अधिक प्रीमियम वैशिष्ट्यांसह एक वेगळी स्टाइलिंग थीम असेल. 5-डोअर अधिक दर्जेदार असणार आहे. जीतुम्हाला स्वतःकडे आकर्षित करेल. इंजिन पर्याय समान राहतील. 


Citroen C3X सेडान


Citroen भारतात C3X सेडानसह एक चांगल्या दर्जाची कार लाँच करणार आहे. ही कार सेडान आकारांसह क्रॉसओवर आहे. ज्यामध्ये रॅडिकल स्टाइलिंग थीम पाहायला मिळणार आहे. याशिवाय, याला पारंपारिक SUV प्रमाणे चांगले ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळेल. परंतू, चर्चा तिच्या लूकबद्दल आहे. तर इंजिन पर्याय C3 Aircross सारखाच असेल. सध्याच्या सिट्रोएन कारपेक्षा इंटिरियर अधिक प्रीमियम असण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Car loan Information:

Calculate Car Loan EMI