Toyota Urban Cruiser Hyryder : मारुती आणि टोयोटा यांच्यातील भागीदारी अंतर्गत, टोयोटाची नवीन हायब्रीड कॉम्पॅक्ट एसयूव्ही टोयोटा हायराइडर आता बाजारात विक्रीसाठी डीलरशिपपर्यंत पोहोचली आहे. टोयोटाची ही कार Hyrider या नावाने बाजारात विकण्यात येणार आहे, तर मारुती आपल्या ब्रँडिंगवर Maruti Vitara या नावाने लॉन्च करणार आहे.


टोयोटाच्या प्लांटमध्ये मारुती विटाराचे उत्पादन
टोयोटाच्या बिदरी येथील प्लांटमध्ये या कारचे उत्पादन केले जात आहे. त्यामुळे त्याचवेळी टोयोटाच्या या प्लांटमध्ये मारुती विटाराही उत्पादन करण्यात येणार आहे. टोयोटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील या नवीन कारसह बाजारात नशीब आजमावत आहे. या कारचे ग्लोबल डेब्यू गेल्या आठवड्यातच झाले. आता ही कार बाजारात विक्रीसाठी शोरूमपर्यंत पोहोचली आहे.


कारचे लूक आणि वैशिष्ट्य
Toyota Urban Cruiser Highrider च्या लूक आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, बाहेरून, यात LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, साइड टर्न इंडिकेटर, रुंद ट्रॅपेझॉइडल लोअर ग्रिल, ट्विन LED-टाइम रनिंग लॅम्प, स्पोर्टी रीअर स्किड प्लेट्स, ड्युअल टोन बॉडी कलर आहेत. अद्वितीय क्रिस्टल अॅक्रेलिक अप्पर ग्रिल क्रोम गार्निश फिनिशसह स्लीक आणि डायनॅमिक आहे. 17-इंच अलॉय व्हील्स आणि एलईडी टेल लॅम्प्स सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. त्याचवेळी, इंटीरियरच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना, सेल्फ-चार्जिंग मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक ग्रेड सिस्टम आणि कारमधील काळ्या आणि तपकिरी इंटीरियरचे संयोजन देखील या एसयूव्हीला एक क्लासी आणि आकर्षक लूक देते.


 मारुती सुझुकी लवकरच घेऊन येतेय नवीन एसयूव्ही


वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन एसयूव्ही (Maruti Suzuki Upcoming Suv 2022) घेऊन येत आहे. कंपनीने अलीकडेच आपली अपग्रेडसह Brezza लाँच केली होती. आता कंपनी आपली नवीन जिमनी (Jimny) मध्यम आकाराची SUV आणण्यासाठी तयारी करत आहे. मारुती 20 जुलै रोजी आपली नवीन कार प्रदर्शित करेल. त्यानंतर ही कार 2022 मध्येच सणासुदीच्या जवळ बाजारात लॉन्च केली जाईल. मारुती सुझुकीला पुन्हा एकदा 50 टक्के भारतीय कार मार्केट कॅप्चर करायचे आहे.  











 










महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI