New Electric Bike: हैदराबाद येथील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Atumobile ने भारतात आपली इलेक्ट्रिक बाईक Atum Vader लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बाईक अधिकृत वेबसाइटवरून 1,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. ही बाईकची प्रारंभिक किंमत आहे, जी केवळ 1,000 युनिट्सच्या विक्रीपुरती मर्यादित आहे. यानंतर बाईकची किंमत वाढू शकते.


100 किमीची रेंज


Atumobile दरवर्षी 25,000 युनिट्सचे उत्पादन करण्याचे लक्ष ठेवत आहे. काही वर्षांत ते 3 लाख युनिट्सपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष आहे. Atum Vader मध्ये 2.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 100 किमीपर्यंत धावते, असा दावा कंपनीने केला आहे. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 2-3 तास लागतील.


कंपनीचा दावा आहे की, अतूट Vader ही देशातील पहिली हाय-स्पीड इलेक्ट्रिक कॅफे रेसर बाईक आहे. जी भारतात डिझाइन केली असून येथेच तयार केली जात आहे. ही बाईक मजबूत ट्युब्युलर फ्रेमवर बांधली गेली आहे आणि सर्व प्रकाश LEDs मध्ये मिळतात.


फीचर्स 


मिळालेल्या माहितीनुसार, या ई-बाईकची टॉप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास आहे. या बाईकमध्ये क्लच आणि लेग ब्रेक नसून हिला थांबवण्यासाठी हँड ब्रेक देण्यात आले आहेत. ही बाईक अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. फुल-एलसीडी डिजिटल स्क्रीन, दोन डिस्क ब्रेक, अँटी थेफ्ट अलार्म, जिओ-फेन्सिंग, ब्लूटूथ, रिमोट लॉक यासारख्या नवीन फीचर्सचा यात समावेश करण्यात आला आहे.


कंपनी या बाईकच्या निर्मितीमध्ये स्थानिक कारखान्यांमध्ये बनवलेल्या 90 टक्के उपकरणांचा वापर करणार आहे. Atum Vader ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक बाईक आहे. यापूर्वी कंपनीने Atum 1.0 e-bike लाँच केली होती आणि कंपनीला आधीच 1,000 युनिट्ससाठी बुकिंग प्राप्त झाली आहे. दरम्यान, बाजारात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक बाईक्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक घ्यायची असेल, तर तुम्हाला स्पोर्ट्स आणि रोडस्टरपासून ते क्रूझर बाईक मिळेल. अलीकडेच, बेंगळुरू येथील स्टार्टअप कंपनी ओबेन इलेक्ट्रिकने आपली इलेक्ट्रिक रोडस्टर बाईक 'ओबेन रोअर' लॉन्च केली आहे. ही बाईक 1 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI