Most Expensive Car Tyres Price: टायरच्या एका संचाच्या किंमतीत फरारी कार खरेदी केली जाऊ शकते का? हे ऐकण्यासाठी थोडसं विचित्र वाटेल. पण, ही गोष्ट खरी आहे. जगातील सर्वात महाग असणाऱ्या टायरच्या किंमतीत एक फरारी कार खरेदी करता येऊ शकते. जगातील सर्वात महाग टायरच्या संचाची चार कोटींना विक्री झाली आहे. 


जगातील सर्वात महाग टायर


आम्ही ज्या टायर्सबद्दल बोलत आहोत ते जगातील सर्वात महाग टायर आहेत. एका टायरची किंमत एक कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत कारच्या टायरच्या सेटची किंमत 4 कोटी रुपये होते. कारच्या टायर्सचा हा संच 2016 मध्ये दुबईमध्ये खरेदी आणि विकला गेला, त्यानंतर जगातील सर्वात महाग टायर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली. याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये  "वर्ल्ड मोस्ट एक्सपेंसिव सेट ऑफ टायर्स" असे नाव देण्यात आले आहे.


टायर भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या कंपनीने बनवले होते


हे टायर्स दुबईमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या झेड टायर्स या कंपनीने बनवले आहेत. या टायर्सवर 24-कॅरेट सोन्याचे पाणी आणि हिरे जडले होते. या टायरची डिझाइन दुबईत तयार करण्यात आली होती. तर, इटलीमधील ज्वेलर्सनी या टायर्सचा सजवण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर या टायर्सची विक्री करण्यासाठी त्यांना पुन्हा दुबईत नेण्यात आले. अबुधाबी येथील प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये दागिन्यांचे काम करणाऱ्या कारागिरांच्या मदतीने टायरला सोनेरी साज चढवण्यात आला.


4.01 कोटींना विक्री


संपूर्ण जगात यासारखे दुसरे टायर नाहीत. दुबईतील REIFEN व्यापार मेळाव्यात ते 2.2 दशलक्ष दिरहम ( 6,00,000 अमेरिकन डॉलर अथवा जवळपास 4.01 कोटी रुपयांमध्ये)  विक्री झाली होती.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI