Audi Q3 Sportback launched in India: जर्मन ऑटोमेकर ऑडीने भारतात आपली Q3 स्पोर्टबॅक कार लॉन्च केली आहे. ही कार काही महिन्यांपूर्वी देशात लॉन्च झालेल्या Q3 SUV ची कूप व्हर्जन आहे. ही कार कंपनीने स्पोर्टियर डिझाइनमध्ये तयार केली आहे. हे कार दिसायला अत्यंत स्टायलिश आहे. यात अनेक जबरदस्त फीचर्स कंपनीने दिले आहेत. याच कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... 


Audi Q3 Sportback launched in India: कशी आहे डिझाइन 


नवीन Q3 स्पोर्टबॅक S-Line बाह्य स्टाइलिंग पॅकेज आणि 5 स्पोक V स्टाइल 'S डिझाइन' आणि 18 इंच अलॉय व्हीलसह येते. Q3 स्पोर्टबॅकमध्ये LED हेडलॅम्प, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि डायनॅमिक टर्न इंडिकेटरसह LED रिअर कॉम्बिनेशन लॅम्प देखील मिळतात. नवीन ऑडी Q3 स्पोर्टबॅक पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात टर्बो ब्लू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथॉस ब्लॅक आणि नवरा ब्लू यांचा समावेश आहे.


Audi Q3 Sportback launched in India: इंटीरियर आणि फीचर्स 


कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात 30 कलर ऑप्शन्स, 10.1-इंच मल्टीमीडिया इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, व्हर्च्युअल कॉकपिट आणि 2-झोन क्लायमेट कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात ओकापी ब्राउन आणि पर्ल बेज असे दोन इंटीरियर रंग पर्याय मिळतात.


Audi Q3 Sportback launched in India: इंजिन 


कार Q3 प्रमाणेच 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 190 hp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार फक्त 7.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते. या कारमध्ये ऑल व्हील ड्राइव्ह क्वाट्रो सिस्टीम देण्यात आली आहे. Q3 स्पोर्टबॅक त्याच्या सेगमेंटमधील SUV कूप कारच्या नवीन ट्रेंडमध्ये सामील झाली आहे. जी आपल्या सेगमेंटमध्ये  सर्वात वर मानली जाते. या कारसह ऑडीने आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. याच्या नवीन लूकमुळे ही इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरते. तसेच याला अधिक शक्तिशाली पेट्रोल इंजिन मिळते, जे Q3 स्पोर्टबॅकला त्याच्या किंमतीत एक उत्तम ऑप्शन बनवते. सध्या या सेगमेंटमध्ये भारतात Q3 स्पोर्टबॅकचा कोणताही मजबूत प्रतिस्पर्धी नाही. Q3 स्पोर्टबॅक स्टायलिश वाहनाच्या शोधात असलेल्या लोकांना आकर्षित करेल. 


Audi Q3 Sportback launched in India: किती आहे किंमत?


दिल्लीतील या नवीन ऑडी Q3 स्पोर्टबॅक कारची एक्स-शोरूम किंमत 51.43 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI