Air Purifier Feature in Car: सध्या देशात प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रदूषणाचा प्रभाव हा फक्त मनुष्यावरच नाही तर सर्वच सजीवांवर होतो. अनेकजण प्रदूषणापासून बचावासाठी घरात प्युरिफायर वापरतात. मात्र आता तर चक्क कारमध्येच प्युरिफायर येणार आहे. कोणत्या आहेत या कार ज्यामध्ये तुम्हाला प्युरिफायरची सुविधा मिळेल, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.
निसान मॅग्नाइट
जर तुम्ही एअर प्युरिफायरसह परवडणारी कार शोधत असाल, तर Nissan Magnite चा XV प्रकार वगळता याच्या वरील सर्व प्रकारांमध्ये हे फीचर मिळेल. निसानच्या या कार्सची किंमत 5.97 लाख रुपयांपासून ते 10.97 रुपयांपर्यंत आहे. पण एअर प्युरिफायर फीचर असलेल्या कारसाठी तुम्हाला 40,000 रुपये जास्त द्यावे लागतील.
Renault Kiger
जर तुम्ही निसान व्यतिरिक्त इतर काही परवडणाऱ्या कारचा शोध घेत असाल, तर Renault Kiger तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या कारच्या RXZ प्रकारात एअर प्युरिफायरची सुविधा आहे. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला ही कार 5.99 लाख रुपयांपासून ते 10.62 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळते.
टाटा नेक्सन
टाटा नेक्सनच्या XZ+(HS), XZA+(HS), XZ+(P) आणि XZA+(P) मॉडेल्सपैकी एक सर्वात जास्त विक्री होणारी SUV, एअर प्युरिफायरसह येतात. या कारची किंमत 7.60 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 14.08 लाख रुपयांपर्यंत जाते.
Hyundai Creta आणि i20
Hyundai आपल्या कारमध्ये एअर प्युरिफायर देखील देत आहे. ह्युंदाई क्रेटा या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारच्या काही प्रकारांमध्ये तुम्हाला एअर प्युरिफायरचा पर्याय दिला जातो. ज्याची किंमत 12 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच Hyundai च्या i20 च्या Sportz CVT मॉडेलसह काही टॉप प्रकारांमध्ये एअर प्युरिफायरची सुविधा देखील मिळते. ज्यासाठी तुम्हाला 9 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील.
Kia Sonet
ही कार कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. एचटीएक्स प्लस व्हेरियंटसह कंपनी तुम्हाला एअर प्युरिफायरची सुविधा देते. Kia कारची किंमत सुमारे 12 लाख रुपयांपासून सुरू होते.
इतर महत्वाची बातमी:
Diwali 2022: दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग 'या' प्रीमियम एसयूव्हीची लिस्ट एकदा पाहाच
Car loan Information:
Calculate Car Loan EMI