Affordable Mileage Cars : सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच आपल्याकडे कार असावी किंवा काहीतरी वाहन असावे असं वाटतं. कारण यामुळे वेळेची बचतही होते आणि प्रवासही आरामदायी होतो. आपल्याला अशी कार हवी असते जी फार महाग नसते आणि कमी खर्चात आपल्या गरजा सहज पूर्ण करू शकते. मात्र, सामान्य वर्गातील ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये मिळणारी मिळणं तसं कठीणच आहे. तर, तुम्हालाही अशीच कार घ्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा 6 कारबद्दल सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम कार निवडू शकता. 


मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) :


Maruti Suzuki WagonR ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. या कारमध्ये 998cc चे पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. ही कार 23.5 kmpl पर्यंत मायलेज देते. WagonR ची एक्स-शोरूम किंमत 5.44 लाख रुपये आहे. या कारची सीएनजी आवृत्ती देखील उपलब्ध आहे.


मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) :


या मारुती कारची किंमत 3.39 लाख ते 5.03 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. कार 798cc पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जी 40.36 Bhp जास्तीत जास्त पॉवर आणि 60Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. ही कार 22.05 किमी मायलेज देते. या कारची सीएनजी आवृत्ती देखील उपलब्ध आहे. 


टाटा नेक्सॉन (Tata Nexon) :


ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. या कारमध्ये 1.2L इंजिन उपलब्ध आहे. या कारची किंमत 7.60 लाख ते 13.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही कार 16.3 kmpl पर्यंत मायलेज देते.


टाटा टियागो (Tata Tiago) :


टाटा कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 85bhp पॉवर निर्माण करते. ही कार पेट्रोलवर 20 kmpl पर्यंत मायलेज देते. टियागोचा सीएनजी पर्यायही उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम 5.39 लाख रुपये आहे.


रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) :


या कारमध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 1.0L पेट्रोल इंजिन जे 5500rpm वर 67bhp पॉवर आणि 4450rpm वर जास्तीत जास्त 91Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरे 799cc इंजिन 54PS पॉवर जनरेट करते. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.64 रुपये आहे. ही कार 22 kmpl पर्यंत मायलेज देते. 


Maruti S-Presso : 


या कारमध्ये 1.0L 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 58.33bhp पॉवर आणि 78 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.25 लाख ते 5.99 लाख रुपये आहे. ही कार 24 ते 25 kmpl मायलेज देते. या कारवर सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI