Cheapest Bike: आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज आपल्या स्वस्त आणि मायलेज बाईकसाठी ओळखली जाते. कंपनीने पुन्हा ग्राहकांच्या अपेक्षांना लक्षात ठेवून आपली नवीन मायलेज बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकचा नाव आहे Bajaj CT125X. बजाज CT125X भारतात 71,354 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. नवीन बजाज CT125X ग्रीन-ब्लॅक, रेड-ब्लॅक आणि ब्लू-ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात अली आहे.
बजाज CT125X चे डिझाइन CT110X सारखेच आहे. याला हॅलोजन बल्बसह गोल हेडलाइट युनिट मिळते. हेडलाइटच्या वर एलईडी डेटाइम रनिंग लाइट देण्यात आली आहे. बाईकला हेडलाइट गार्ड, इंजिन क्रॅश गार्ड आणि मागील लगेज रॅक मिळतात. या बाईकमध्ये फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन देण्यात आले आहे. जे रबरने झाकले गेले आहे. बाईकच्या मागील बाजूस ड्युअल गॅस चार्ज्ड स्प्रिंग लोडेड रिअर सस्पेंशन आहे. याचे ब्रेकिंग सिस्टिम सुधारण्यासाठी याला समोरील बाजूस 240 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तर मागे ड्रम ब्रेक हा पर्याय आहे. बाईकमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स 80/100 फ्रंट टायर आणि 100/90 मागील टायर आहेत. बाईकचा मागचा टायर जाड आहे. ज्यामुळे रस्त्यावर अधिक पकड मिळते आणि बाईकचे नियंत्रणही वाढते.
इंजिन
बजाज CT125X मध्ये125 cc DTS-i, एअर-कूल्ड इंजिनसह येते. हे इंजिन 10 bhp पॉवर आणि 11 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बजाज CT125X या सेगमेंटमध्ये Hero Super Splendor आणि Honda Shine शी स्पर्धा करेल. तसेच भारतीय बाजारात ही बाईक TVS Raider, Bajaj Pulsar 125 आणि Pulsar NS125 शी देखील स्पर्धा करेल.
दरम्यान, बजाज 350cc मिडल-वेट मोटरसायकल सेग्मेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. एका रिपोर्टनुसार, बजाज या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी ट्रायम्फसोबत भागीदारी करून नवीन बाईक आणण्याची तयारी करत आहे. ही बाईक सध्या कंपनी डेव्हलप करत आहे. युकेत याची चाचणी देखील करण्यात आली आहे. मॉडेलचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. रिपोर्ट्सनुसार, ही बाईक यावर्षी भारतीय बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी या वर्षीच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये नवीन बाईक लॉन्च करू शकते, अशीही चर्चा आहे.
रिपोर्ट्सनुसार, बजाज ट्रायम्फसोबत दोन मॉडेल्सवर काम करत आहे. जे स्क्रॅम्बलर आणि रोडस्टर डिझाइनचे असू शकतात. अलीकडेच यापैकी एक बाईक चाचणी दरम्यान दिसली आहे. ही बाईक ट्रायम्फ बाईक सारख्या खास डिझाइन पॅटर्नमध्ये दिसली आहे. आगामी बजाज आणि ट्रायम्फ बाईक भारतातील बजाजच्या दुचाकी प्लांटमध्ये तयार केल्या जातील आणि येथून इतर देशांमध्ये निर्यात केल्या जातील. बजाज-ट्रायम्फ बाईकची किंमत सुमारे 2 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI