2022 New Baleno Booking : सर्वाधिक मागणी असणाऱ्या बलेनो 2022 कारसाठी (2022 New Baleno) प्री बुकिंग सुरू झाली आहे. प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सांगितले की, 2022 Baleno साठी तुम्ही Nexa आऊटलेट आणि कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन बुकिंग करू शकता. या कारची बुकिंग फक्त 11 हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. 2022 बलेनो आकर्षक डिझाईनसह बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला अनेक अपडेटेड फीचर्स पाहायला मिळतील. या कारच्या किंमतीबाबत कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. ही कार या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. लॉन्च केल्यावर, ते Hyundai i20, Tata Altroz, Toyota Glanza आणि Honda Jazz सारख्या कारशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे.
जाणून घ्या या कारचे फीचर्स :
मारुती सुझुकीचा दावा आहे की 2022 बलेनोमध्ये हेड-अप डिस्प्ले आहे. या कारमध्ये तुम्हाला स्पीडोमीटर, क्लायमेट कंट्रोल यांसारखी महत्त्वाची माहिती मिळेल. यामुळे, ड्रायव्हरला रस्त्यावरून नजर हटवण्याची गरज नाही. तसेच तो वाहन चालवताना अधिक सोयीस्कर होईल. यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील. नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनो कारमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये दिसतील. पहिल्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीने ते खूप अपडेट केले आहे.
इंजिन :
नवीन बलेनोच्या इंजिनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत. हे इंजिनही जुन्या मॉडेलप्रमाणेच असेल. नवीन बलेनो के-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिनसह आयडल स्टार्ट-स्टॉप फंक्शनसह येईल. तथापि, कंपनीने नवीन बलेनो 2022 ची पॉवर आणि टॉर्क खुलासा केलेला नाही. नवीन बलेनो आऊटगोईंग मॉडेलप्रमाणेच पॉवर आणि टॉर्क जनरेट करेल अशी अपेक्षा आहे.
अपडेटेड डिझाईन :
नवीन बलेनोचे डिझाईन आणि केबिन अपडेट करण्यात आले आहे. या कारचे अलॉय व्हील डिझाइनही अपडेट करण्यात आले आहे. नवीन बलेनो सुधारित फ्रंट फेससह येईल. यात अपडेटेड फ्रंट ग्रिल, शार्प एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाईट्स, अपडेटेड बंपर मिळतील.
महत्वाच्या बातम्या :
- Tesla Car : थांबायला सांगितलं तरी न ऐकणाऱ्या ड्रायव्हरलेस टेस्ला कार परत बोलावणार
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
- Maruti Suzuki Baleno : फेब्रुवारीमध्ये लाँच होणार नवी मारुती सुझुकी बलेनो, 6 एअरबॅग आणि AMT फीचर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Car loan Information:
Calculate Car Loan EMI