Mahindra Thar Per Day EMI : महिंद्रा थार (Mahindra Thar Car) ची देशात प्रचंड लोकप्रियता आहे. त्याच्या यशाबद्दल बोलायचे झाले तर, जानेवारी 2022 मध्ये महिंद्रा थार कार सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. 


महिंद्रा थारच्या विक्रीत 47 टक्क्यांनी वाढ 
भारतीय ऑटोमेकरने गेल्या महिन्यात जानेवारी 2021 मध्ये थार एसयूव्हीच्या 4,646 युनिट्सची विक्री केली आहे. तर याच्या विक्रीत 47 टक्के वाढ झाली आहे. तसेच या कारचा वेटींग पीरियड देखील एक वर्ष असणार आहे, म्हणजे जर तुम्ही आज कार बुक केली तर तुम्हाला एका वर्षानंतर कार ताब्यात मिळेल.



LX आणि AX पर्यायी वेरिएंट
महिंद्रा थार मध्ये LX आणि AX असे  2 पर्याय उपलब्ध आहेत. LX प्रकारात, तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही ट्रिम मिळतात. यात ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देखील मिळतो, तर AX ऑप्शनल मध्ये, तुम्हाला फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल. LXची सुरुवातीची किंमत 13 लाख 79 हजार 309 रुपये (एक्स-शोरूम पुणे) इतकी आहे. तर AX ऑप्शनलमध्ये सुरुवातीची किंमत. 13 लाख 17 हजार 779 (एक्स-शोरूम पुणे) आहे. LX वर, तुम्हाला कन्वर्टिबल सॉफ्ट टॉप (पेट्रोल AT सह डिझेल MT आणि AT) आणि हार्ड टॉप मिळेल. यात HVAC,टचस्क्रीन, DRL, alloys, 4WD, MLD, BLD आणि R18 A/T टायर, ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टम ड्रायव्हर, ESP, रोल केज, 2 एअरबॅग आणि ABS मिळतात. त्याच वेळी, काही वैशिष्ट्ये AX ऑप्शनल मध्ये काही फिचर्स समान आहेत तर काही वेगळे आहेत.


दिवसाला 691 रुपयांत कार घेऊ शकता
कंपनीच्या वेबसाइटनुसार, AX ऑप्शनलच्या किंमतीनुसार 20,482 रुपयांचा EMI रुपये प्रति महिना भरावे लागेल. जर तुम्ही प्रत्येक महिन्यातील 31 दिवसांचा विचार केला तर ते दिवसाला 691 रुपये किंमत असेल, म्हणजे दररोज फक्त 691 रुपयांचा भार असेल आणि ही कार तुमची असू शकते.


 


संबंधित बातम्या :



 


 


 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI