2022 Maruti Suzuki Baleno Facelift : मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट (Maruti Suzuki Baleno Facelift 2022) लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. अपडेटेड बॅलेनो हॅचबॅक काही दिवसांपूर्वी असेंब्ली लाईनवर दिसली होती. आता त्याचा टीझर इंटरनेटवर समोर आला आहे. यामध्ये मॉडेलचे काही फ्रंट-एंड एक्सटीरियर हायलाईट केले गेले आहेत. मात्र, कंपनीने या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  2022 बलेनो फेब्रुवारीच्या अखेरीस भारतातल्या मार्केटमध्ये विक्रीसाठी जाण्याची शक्यता आहे. त्याचे अधिकृत बुकिंगही लवकरच सुरू होऊ शकते. 


लीक झालेल्या कारच्या फोटोप्रमाणे, कारला एलईडी डीआरएलसह पूर्ण एलईडी हेडलॅम्प, क्रोम फिनिशसह नवीन ग्रिल आणि एलईडी फॉग लाईट मिळू शकतात. याबरोबरच कारला बदललेले एअर डॅम आणि नवीन बंपर देखील मिळू शकतात. यात 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील दिली जाऊ शकते. हे वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करू शकते. यामध्ये सहा एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये असू शकतात.


मात्र, कारच्या इंजिन सेटअपमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे मानले जात आहे. नवीन बलेनो 1.2-लीटर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे, जे पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन युनिट आणि CVT युनिटच्या पर्यायासह येईल. लॉन्च केल्यावर, ते Hyundai i20, Tata Altroz, Toyota Glanza आणि Honda Jazz सारख्या कारशी स्पर्धा होऊ शकते. 


मारुती सुझुकी वॅगनआर फेसलिफ्ट लवकरच लॉंचिंगच्या मार्गावर 


मारुती सुझुकी वॅगनआर फेसलिफ्ट देखील फेब्रुवारीमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. नवीन मॉडेल काही बदलांसह सादर केले जाऊ शकते. काही कॉस्मेटिक बदल करण्यासोबतच त्यात नवीन फीचर्सही जोडता येतील. यात 15-इंच अलॉय व्हील्स देखील मिळू शकतात. कारच्या बंपरमध्येही बदल होऊ शकतो.  कारच्या आतील डॅशबोर्डमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. 2022 WagonR ला 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी देखील मिळू शकते.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI