Audi Q7 Launched in India : अलिशान अशी ओळख असलेल्या कार उत्पादक कंपनी ऑडीने भारतात ऑडी क्यू-7 ही गाडी लाँच केली आहे. परफॉर्मन्स, स्टाईल आणि ड्रायव्हिंगसाठी उत्तम अशा सोयीसुविधांनी ही डिझाइन करण्यात आली आहे. शिवाय कंपनीचा दावा आहे की, अवघ्या 6 सेकंदांमध्ये 0-100 किमी/तास गती प्राप्त करते. या कारमध्ये अधिक एैसपैस जागा आणि अनेक फीचर्स आहेत. शिवाय या गाडीचे ऑडी क्यू-7 प्रिमिअम प्लस आणि ऑडी क्यू 7 टेक्नोलॉजी या दोन व्हेरीयंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ऑडी क्यू 7 मध्ये गतीशील 3 लिटर व्‍ही-6 टीएफएसआय इंजिन आहे. या कारमध्ये अधिक एैसपैस जागा व वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये देखील आहेत. भारतीय बाजारपेठेत या गाडीची किंमत व्हिरेएंटनुसार अनुक्रमे 79 लाख 99 हजार आणि 88 लाख 33 हजार इतकी आहे.


ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले की, ऑडी क्यू 7 अनेक वर्षांपासून आमच्या क्यू-रेंजची आयकॉन राहिली आहे. आम्हाला विश्वास आहे की, नवीन लुक व अद्ययावत वैशिष्ट्यांनी युक्त नवीन मॉडेल ट्रेलब्लेझर ठरेल. ऑडी क्यू 7 ची ऑन-रोड व ऑफ-रोड वैविध्यपूर्ण कार्यक्षमता प्रमुख पैलू आहे, जो कारला इतरांपेक्षा वेगळे ठरवतो. 


कार्यक्षमता व ड्रायव्हिंग क्षमता:
3 लिटर व्ही6 टीएफएसआयसह 48 व्‍होल्‍ट माइल्ड हायब्रिड सिस्टिम 340 एचपी शक्ती आणि 500 एनएम टॉर्कची निर्मिती करते. माइल्ड हायब्रिडमध्ये 48-व्‍होल्‍ट इलेक्ट्रिकल सिस्टिम आहे, जी बेल्ट अल्टरनेट स्टार्टरला (बीएएस) पुरेशी शक्ती देते. ही सिस्टिम इंजिनला कोस्टिंगच्या वेळी जवळपास 40 सेकंदांपर्यंत बंद ठेवते. बीएएस सिस्टिम मागणीनुसार आपोआपपणे वेईकल पुन्हा सुरू करते. दिग्गज क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह, अॅडप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह सात ड्राइव्ह मोड्सच्या (ऑटो, कम्फर्ट, डायनॅमिक, एफिशिएन्सी, ऑफरोड, ऑल-रोड व इंडिव्हिज्युअल) परिपूर्ण संयोजनासह ऑडी क्यू७ अद्वितीय ड्राइव्ह अनुभव देते.


इंटीरिअरमध्ये सुलभ एर्गोनॉमिक्स व उत्तम हाताळणीसाठी कॉकपीट डिझाइनभोवती ड्रायव्हर-केंद्रित रॅप आहे.  कॉकपीट आर्किटेक्चर परिपूर्णरित्या नवीन, डिजिटल ऑपरेटिंग कन्सेप्टमध्ये सामावून जाते, ज्यामध्ये दोन मोठ्या टचस्क्रीन्स आहेत. फ्लॅट, वाइडर लुकिंग सिंगल फ्रेम ग्रिलसह ऑक्टगोनल आऊटलाइन आणि नवीन सिल ट्रिम, जे स्टान्स अधिक वाढवते. पुढील बाजूस नवीन बम्‍पर आणि उच्च एअर इनलेट्ससह प्रबळ त्रिमिती इफेक्ट आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI