एक्स्प्लोर

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तोडली जाणारी 5 हजार झाडं उद्धव ठाकरे वाचवणार का?

औरंगाबादमधील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी उद्यानात मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतल्या आरे कॉलनीप्रमाणे प्रियदर्शनी उद्यानातील झाडं वाचवणार का? असा सवाल पर्यावरण प्रेमी विचारत आहेत.

औरंगाबाद : आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडला स्थगिती देणाऱ्या शिवसेनेचा दुटप्पीपणा औरंगाबादमधील 17 एकरचे प्रियदर्शिनी उद्यान उघड करत आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेने या परिसरातील झाडं जाळली जात असताना, कापली जात असताना मौन बाळगलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी परिसरातील झाडं आणि जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यामुळे आरेचा न्याय प्रियदर्शनी उद्यानाला मिळेल का? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यान हे पर्यावरणप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे. या उद्यानात लोकांना तासनतास फिरावसं वाटतं. शहरातील सर्वात शुद्ध हवा इथे आहे. शहरातील लोक या उद्यानाला ऑक्सिजन हब म्हणतात. 70 हून जास्त प्रजातींचे पक्षी, 40 प्रकारची फुलपाखरं, सरपटणारे जीव आणि आकाशाला स्पर्श करु इच्छिणारी उंचच उंच झाडं या उद्यानात आहेत. परंतु जे आज दिसतंय ते या उद्यानाचं निम्मं राहिलेलं वैभव आहे. या उद्यानाची जागा सिडकोकडून मनपाच्या ताब्यात आली आणि त्यानंतर या उद्यानातील 443 झाडं प्रस्तावीत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती प्रकल्पाचा एकूण खर्च - 64 कोटी उद्यानाचा परिसर - 17 एकर पुतळ्यासाठी जागा - 1 हजार 135 चौरस मीटर फुड पार्कसाठी जागा - 2 हजार 330 चौरस मीटर म्युझियमसाठी जागा - 2 हजार 600 चौरस मीटर ओपन एअर स्पेस - 3 हजार 690 चौरस मीटर प्रियदर्शनी उद्यानात हे सगळं उभं करायचं असेल तर किमान पाच हजार झाडं तोडावी लागतील, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. या मनमानीविरुद्ध पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला आहे. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून सकारात्मक आंदोलन सुरु झालं आहे. 6 वर्षांच्या मुलांपासून ते साठीतले आजोबाही झाडं वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, उद्यान विभागाच्या कृपेनं भर उन्हात झाडं पाण्याअभावी काळी पडत होती, मरत होती. हे पाहून पर्यावरणप्रेमींनी वॉक अँड वॉटर (#WalkAndWater) हा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यामुळे अनेक झाडं वाचली. दरम्यान, याप्रकरणी जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मनपाने दुष्काळाचे कारण देत झाडं कमी झाल्याचे स्वतःच मान्य केले. पण याच कथित पाणी टंचाईच्या तीन वर्षांच्या काळात उद्यान विभागाने शहरात 66 हजार 69 झाडं लावली कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे. उद्यानातील झाडं कमी होण्याचे टप्पे (उद्यानात सुरुवातीला एकूण 10 हजारहून अधिक झाडं होती) 12 जानेवारी 2016 - उद्यानात 9 हजार 885 झाडांची नोंद 30 नोव्हेंबर 2019 - उद्यानात 8 हजार 970 झाडांची नोंद कमी झालेल्या झाडांची संख्या - 1 हजार 225 झाडे गेल्या तीन वर्षात उद्यान विभागाने लावलेली झाडे - 0 स्थानिक लोकांनी, पर्यावरण प्रेमींनी भर उन्हाळ्यात स्वतः पाणी घालून झाडं वाचवली, पावसाळ्यात लहान-मोठे बांधारे बांधले, स्वच्छता केली तरिही पालिकेला पाझर फुटला नाहीच. याऊलट पालिकेने हे उद्यान दारुडे, गर्दुल्ले, नशेखोरांच्या हवाली केलं आहे. लोकांनी वर्गणी काढून दुरुस्त केलेले उद्यानाचे कुंपण गर्दुल्ल्यांनी तोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke On Amit Shah: तुम्ही चाणक्य कसले, हे तर तुमचं अपयश, राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा
तुम्ही चाणक्य कसले, हे तर तुमचं अपयश, राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Embed widget