औरंगाबाद : मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या जवळपास 35 हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे यात मोठमोठे राजकीय नेते आणि महसूल विभागातील बडे अधिकारी सुद्धा सहभागी असल्याच पुढं येतंय. तर आतापर्यंत या प्रकरणात मराठवाड्यात 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहेब  यांच्या 71 एक्कर 89 गुंठे जमीन घोटाळ्यात अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळकेला अटक केल्यानंतर खळबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवस्थान आणि वक्फ जमिनिच्या घोटाळ्यातील प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला असल्याचे बोलले जात आहे. पण एकट्या आष्टीतच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात अनेक देवस्थान आणि वक्फ जमिनिवर भूमाफीयांनी  गिळंकृत केली आहेत. तर याप्रकरणी महाराष्ट्रात आतापर्यंत 13 तर मराठवाड्यात 7 गुन्हे दाखल झाले आहेत. 


या घोटाळ्यात फक्त महसूल अधिकारीच नव्हे तर राजकीय दिगग्ज नेत्यांची सुद्धा नावे समोर आली आहेत. भाजप नेते सुरेश धस यांनी देवस्थान आणि वफ्फ बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागांचा घोटाळा केल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तर या प्रकरणाची आधीच चौकशी झालेली आहे, हे आरोप खोटे आहेत. नवाब मलिक यांना कोण माहिती पूरवतंय याचं मला आश्चर्य वाटतं. त्यामुळे मालिकांनी असं बेजबाबदारपणे बोलू नये असे आमदार सुरेश धस म्हणाले. 


या सर्व देवस्थान आणि वफ्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याची सीआयडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. औरंगाबाद शहरातील जालना रोडवर उभा राहिलेला इमारतींची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचा त्याचा आरोप आहे. 


महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात कुठे किती आणि कोणत्या मालमत्ता हडप केल्याचा आरोप आहे. 


1. दर्गाह कोचकशाह वली ऊर्फ शहिन्शाह वली, रहे, बीड
2. लाल मस्जीद, परतुर जि. जालना
3. दर्गाह हजरत जियाऊद्दिन रफाई देगलूर जि. नांदेड
4. दर्गाह हजरत मौलाना साहेब, पैठण ता. पैठण जि. औरंगाबाद
5.दर्गाह बु-हान शाह वली, इदगाह व कब्रस्तान, जिंतुर रोड परभणी
6. दर्गाह बु-हान शाह वली, इदगाह व कब्रस्तान, जिंतुर रोड परभणी 
7. दर्गाह बु-हान शाह वली, इदगाह व कब्रस्तान, जिंतुर रोड परभणी
8. कब्रस्तान की मस्जीद आणि मजार हजरत शाह आलम शाह ता. परतुर जि. जालना 
9. मस्जीद मौजे देविनिमगांव ता. आष्टी जि. बीड 
10. ताबुत इनाम इंडोमेंट ट्रस्ट, माण ता. मुळशी जि. पुणे 
11. दर्गाह गैबी पीर साहेब, कब्रस्तान व मस्जीद मौजे चिचपुर ता. आष्टी जि. बीड 
12. जुम्मा मस्जीद ट्रस्ट, बदलापुर, ता. अंबरनाथ जि. ठाणे 
13. दर्गाह नुरुल हुदा खानखा मस्जीद आणि कब्रस्तान, दिल्ली गेट औरंगाबाद 


एवढी मोठी जमीन हडप केली असताना वफ्फ बोर्डाकडे असलेलं मनुष्यबळ खूपचं कमी आहे. सध्या या बोर्डकडे एकूण 31 कर्मचारी आहेत. यामध्ये क्लार्क 11, रिजनल वफ्फ ऑफिसर 02, वफ्फ ऑफिसर 03, अकाऊंटर 01, शिपाई 12 आणि 
इतर 03 अशी कर्मचारी संख्या आहे. 


देवस्थान व दर्गाहच्या  शेकडो एकर जमिनीवर बोगस कागदपत्र तयार करून जमीन लाटणाऱ्या रॅकेटची पायमुळं शोधणं वफ्फ बोर्डासमोर आवाहन असणार आहे. त्यातच अपुर मनुष्यबळ आणि महसुल विभागाच्याच अधिकाऱ्यांचा सहभाग वफ्फ बोर्डाची वाट अधिक बिकट करणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :