Aurangabad: 'पुष्पा'ची मूर्ती साकारणाऱ्या औरंगाबादच्या 'सोहन'ला अल्लू अर्जुनची स्पेशल भेट
Aurangabad News: अल्लू अर्जुनने आतापर्यंत मीळालेल्या फ़िल्म फ़ेअर अवार्डच्या लाइनमध्ये ही मूर्ती ठेवली आहे.
Meet Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'पुष्पा' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले असले तरी 'पुष्पा'ची क्रेझ कायम आहे. दरम्यान औरंगाबादच्या सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा भन्नाट असा पुतळा साकारला होता. तसेच तयार केलेला पुतळा अल्लू अर्जुन याला भेट द्याव अशी त्यांची इच्छा होती. त्यांची हीच इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झाली असून, अल्लू अर्जुनने त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांची मूर्ती स्वीकारली आहे.
अशी झाली भेट...
सोहन आणि अल्लू अर्जुनची भेट हैद्राबाद येथील अल्लू अर्जुन फॅन क्लबचे प्रेसिडेंट रविकुमार गड्डम यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. त्यांच्या पुढाकाराने ही भेट प्रत्यक्षात झाली आहे. हैद्राबाद येथील अल्लू अर्जुन यांच्या घरी ही भेट झाली. तीथे अलु अर्जुन यांचे सासरे चंद्रशेखर रेड्डी यांनी सुद्धा सोहन कुमार यांच्या कलेचं कौतुक केले. त्यांनतर तयार केलेला पुतळा सोहन कुमार यांनी अल्लू अर्जुनला भेट दिला. स्वतःचा पुतळा पाहून त्याने सोहन कुमार यांच्या कलेला दाद देत आभार मानले. तसेच ती मूर्ती अल्लू अर्जुनने आतापर्यंत मीळालेल्या फ़िल्म फ़ेअर अवार्डच्या लाइनमध्ये ठेवली आहे. तर यावेळी भेटीला गेलेल्या सोहन यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा अल्लू अर्जुनने भेट दिली. त्यामुळे मी बनवलेली मूर्ती आता योग्य ठिकाणी पोहचली असल्याच सोहन म्हणाले.
कशी आहे मूर्ती...
लेबर कॉलनीतील रहिवासी असलेले आणि फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंगचे काम करणारे सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा पुतळा साकारला आहे. शाडू मातीची अल्लूची हातात बंदूक घेतलेली मूर्ती 12 तासांत तयार केली. ती सहा इंच उंच आहे. तसेच तयार केलेल्या मूर्तीवर रंगकाम करण्यात आले आहेत. त्यानंतर ती काचेच्या पेटीत ठेवून आजूबाजूला गवत ठेवण्यात आले होते. तसेच सोहनकुमार यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून खडूपासून साईबाबा, श्री स्वामी समर्थ, मायकेल जॅक्सन, मीराबाई आदींच्या 50 पेक्षा अधिक मूर्ती साकारल्या आहेत.