Aurangabad News: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर (Gram Panchayat Election) आता ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतल्या जात आहे. दरम्यान औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा ग्रामपंचायतमध्ये देखील आज मंगळवारी पहिली महिला ग्रामसभा पार पडली. यावेळी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तर या पहिल्या महिला ग्रामसभेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आली असून, ज्याची आता जिल्हाभरात चर्चा होऊ लागली आहे. 


नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गेवराई पायगा येथील ग्रामपंचायतसाठी देखील निवडणूक पार पडली होती. याच निवडणुकीत गावकऱ्यांनी थेट जनतेतून मंगेश साबळे यांची सरपंचपदासाठी निवड केली होती. दरम्यान आज सरपंच साबळे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावकरी आणि महिलांच्या एकमताने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.  ज्यात गावात दारूबंदी, गुटखाबंदी, सिगरेट, बिड्या आणि तंबाखूसह नशायुक्त पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांची विक्री करताना आढळून येणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठवण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. 


महिलांच्या हिताचे निर्णय! 


दरम्यान याचवेळी गावातील महिलांना भेडसावत असलेया विविध समस्यावर विशेष चर्चा करण्यात आली. तसेच महिला सशक्तिकरण, उद्योगीकरण, पंधरा वित्त आयोगामध्ये महिलांसाठी येणाऱ्या विशिष्ट योजना व तसेच संपूर्ण महिलांच्या मागणीस्तव गावात माहिती देण्यात आली.  सोबतच आदर्श गाव योजनेकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवण्यात आले. मात्र याचवेळी गावात होणाऱ्या विविध विकास कामांमध्ये जो अडथळा निर्माण करेल त्याला कुठलाही शासकीय लाभ मिळणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला आहे. 


यावेळी सरपंच मंगेश साबळे, ग्रामसेवक राठोड, उपसरपंच कचरू साबळे, बाबुराव वाडेकर, कविता वाघ, पोलीस पाटील पंढरीनाथ जयतमाल, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पाटील साबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.


ग्रामसभेची जिल्ह्यात चर्चा! 


औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महिला ग्रामसभेत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दारूबंदी, गुटखाबंदी, सिगरेट, बिड्या आणि तंबाखूसह नशायुक्त पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आला असून, विक्री करणाऱ्या व्यक्तीला 50 हजारांचा दंड दिला जाणार आहे. त्यामुळे गेवराई पायगा गावातील गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. तर गावकऱ्यांचे कौतुक देखील होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ; हॉल तिकीट मिळालेच नाही