Aurangabad News: बातमी औरंगाबादहून असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Exam) गोंधळ समोर आला आहे. दहा वाजता पेपर असून देखील विद्यार्थ्यांना (Students) वेळेत हॉल तिकीट (Hall Ticket) न मिळाल्याने गोंधळ उडाला आहे. त्यामुळे विना हॉल तिकीटच परीक्षा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज बिटेक, बीए, एलएलबी सेमिस्टरची परीक्षा होत आहे. सकाळी 10 वाजता ही परीक्षा सुरु होणार होती. मात्र परीक्षा सुरु होईपर्यंत देखील विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नसल्याने मोठा गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या. हॉल तिकीट नसल्याने कोणत्या वर्गात बसावे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहता विद्यापीठ प्रशासनाने विना हॉल तिकीटच परीक्षा सुरु केली आहे. 


पीआरएन नंबरवर परीक्षा... 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज बिटेक, बीए.एलएलबी सेमिस्टरची परीक्षा होत आहे. मात्र पेपर सुरु होण्याची वेळ उलटून देखील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे अखेर विद्यापीठ प्रशासनाने पेपरवर पीआरएन नंबर (PRN Number) टाकण्याची सूचना विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु केली आहे. मात्र यासर्व गोंधळानंतर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. 


विद्यापीठाचा सावळा गोंधळ


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत झालेला गोंधळ काही नवीन नाही. यापूर्वी देखील असेच काही प्रकार समोर आलेले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी दोन महिन्यापूर्वी जमा केली जाते. त्यामुळे परीक्षेला किती विद्यार्थी असणार आहे याची संपूर्ण माहिती विद्यापीठ प्रशासनाकडे असते. मात्र तरी देखील परीक्षा सुरु होईपर्यंत हॉल तिकीट तयार केले जात नसल्याने विद्यापीठ प्रशासनाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे यासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील परीक्षा केंद्रात असाच गोंधळ उडाला होता. मात्र तरीही यातून विद्यापीठ प्रशासनाने (University Administration) कोणताही धडा घेतला नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात; राष्ट्रवादी- भाजपमध्ये होणार लढत