HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेची औरंगाबाद विभागीय मंडाकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी यंदा परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
नुकतेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले आहे. या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. बारावीचा पहिला पेपर 21 फेब्रुवारीला असणार आहे. औरंगाबाद विभागीय मंडळाने या परीक्षेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. औरंगाबाद विभागीय मंडळातून 1 हजार 360 विद्यालयातील एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रावर होणार आहे.यासाठी 58 परिरक्षक केंद्र असणार आहे.
यावेळी असा असणार बदल!
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. मात्र यंदाच्या या बोर्डांच्या परीक्षेसाठी काही विशेष निणर्य घेण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या दहावी आणि बारावी होम सेंटर पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 2021-22 मध्ये होम सेंटरचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता तशी परिस्थिती नसल्याने या दोन्ही परीक्षेत होम सेंटर पद्धत रद्द करण्यात आली आहे. या सोबतच दोन्ही परीक्षेदरम्यान यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. तर या परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. दरम्यान परीक्षेत कॉपी होऊ नयेत म्हणून, परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या वेळी झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
जिल्हा | विद्यालय संख्या | परीक्षा केंद्र | परीक्षक केंद्र | नियमित विद्यार्थी |
औरंगाबाद | 470 | 157 | 21 | 60400 |
बीड | 298 | 101 | 15 | 38929 |
परभणी | 233 | 59 | 08 | 24366 |
जालना | 239 | 80 | 09 | 31127 |
हिंगोली | 120 | 33 | 05 | 13441 |
एकूण | 1360 | 430 | 58 | 168263 |
इतर महत्वाच्या बातम्या:
HSC Exam 2023: बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! सराव परीक्षा दिल्याशिवाय यंदा अंतर्गत गुण नाहीच
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI