Rain Update News: औरंगाबादमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
औरंगाबादमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अनेक भागात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळताना पाहायला मिळत आहे.
![Rain Update News: औरंगाबादमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी maharashtra News Aurangabad Rain Update News Rain Update News: औरंगाबादमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/db6e4f84c90f103719d5379893445bc1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Rain Update News: मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असून मराठवाड्यात सुद्धा काही जिल्ह्यात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी, पाचोड येथे विजेच्या व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सुरवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोणत्या तालुक्यात किती पाऊस...
औरंगाबाद जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास शहरात आणि ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी मृगाच्या पावसाने हजेरी लावली होती. तर आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस पडत आहे. औरंगाबाद तालुक्यात आतापर्यंत 15.2 मिलिमीटर पाऊस पडला असून, पैठणमध्ये 0.9, गंगापूर 14.1, वैजापूर 12.6,कन्नड 24.2, खुलताबाद 24.8, सिल्लोड 8.9, सोयगाव 01 आणि फुलंब्रीत सुद्धा 01 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.
हवामान खात्याचा इशारा...
दिनांक 10 जून: कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. विदर्भ विभागातील सर्वच जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा ( वा-याचा वेग ताशी 40-50 कि.मी. ) वाहण्याची आणि विदर्भ विभागातील बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाटासह गारपिट होण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांत मध्य महाराष्ट्र विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली,परभणी, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.
दिनांक 11 जून: कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ विभागातील सर्वच जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा ( वा-याचा वेग ताशी 30-40 कि.मी. ) वाहण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांत मध्य महाराष्ट्र विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.
दिनांक 12 जून: कोकण विभागातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)