Sanjay Shirsat: प्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागणार; संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Sanjay Shirsat: फक्त 20 लोकांवर मंत्रीमंडळ चालणार नाही ते वाढवावेच लागणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहे.
Sanjay Shirsat: शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करत असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याची का दखल घेत नाहीत हे कळत नसल्याचं शिरसाट म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तर मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही? तर करावाच लागले हे मी ठामपणे सांगतोय. यात कुणाला मंत्रिपद मिळेल यात मला जास्त रस नाही, पण अपेक्षा आहेत. तर 20 ते 22 दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होईल असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा पुढचा विस्तार लवकरच होणार असल्याचं शिरसाट म्हणाले. मंत्रीमंडळ विस्तार लवकर व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असून, अशी मागणी देखील होत आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास कामाचा वेग वाढेल. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोललो असल्याचं शिरसाट म्हणाले. मात्र त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असून, येणाऱ्या 15 तारखेपर्यंत त्या अडचणी संपतील. तर 20 लोकांवर मंत्रीमंडळ चालणार नाही ते वाढवावेच लागणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार करावेच लागणार असून, ते कुणालाही थांबवता येणार आहे. मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही?, तर करावाच लागले हे मी ठामपणे सांगतोय असेही शिरसाट म्हणाले.
संजय राऊतांवर टीका
यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, शिंदे गटाने उठाव केला असल्याचं आम्ही सतत सांगतोय. तर शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करताय. त्यांना बडवे नाही तर भडवे म्हणा असे मला लोकं सांगतात. संजय राऊत याना शिवसेना वाढावी असे वाटत नाही. स्वतःच अस्तित्व टिकवण्याची ही सर्व धडपड सुरु आहे. सुषमा अंधारे शांत झाल्यात, मात्र संजय राऊत सुरूच आहे. शिवसेनेचे रावते सारखे अनेक नेते संपले, सगळं वाटोळं संजय राऊत करतायत. मात्र असे असतांना उद्धव ठाकरे त्यांची दखल का घेत नाही असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
अब्दुल सत्तार माझे मित्र...
आमच्याच पक्षातील काही लोकं माझ्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलखातीवेळी केला होता. तर माझे मंत्रिपद त्यांना मिळेल अशी अपेक्षा कट रचणाऱ्या लोकांना असल्याचं देखील सत्तार म्हणाले होते. त्यामुळे सत्तार यांचा निशाणा संजय शिरसाट यांच्याकडे असल्याची चर्चा होती. यालाच उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर आरोप केले नसून, सत्तार माझे मित्र असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
अंबादास दानवेंना उत्तर...
औरंगाबादच्या वैजापूर येथील सभेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलतांना, माजी आमदार वाणी असते तर त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना बुटाने मारले असते असे विधान केले होते. त्यांच्या याच टीकेला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी जोडो मारतो असे म्हणणं त्यांना शोभत नाही. दानवे हे संजय राऊत यांच्या चेल्यासारखे वागताय. त्यामुळे सद्या शिवसेना डूबवायचं काम सुरु असल्याचं शिरसाट म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :