Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, त्याला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आज औरंगाबादमध्ये शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने करणार आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने केली जाणार आहे. 


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले होते. ज्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यात शिंदे सरकार येताच या निर्णयांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात आज शहरातील टी.व्ही.सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा काही ठिकाणी निदर्शने केले जाण्याची शक्यता आहे. 


नामांतराचा निर्णय आज होणार: मुख्यमंत्री 


उद्धव ठाकरे यांच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे कारण सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची सरकार अल्पमतात असतांना हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अल्पमतात असे निर्णय घेता येत नाही. म्हणून शनिवारी आम्ही याबाबत मंत्रीमंडळाची बैठक बोलावून त्यात नामांतराच्या प्रस्तावाला कायदेशीर मंजुरी देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 


एमआयएमचा विरोध...


औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाला एमआयएमकडून प्रचंड विरोध करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात याविरुद्ध शहरात मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. मात्र त्यांनतर आता शिंदे सरकार दुसऱ्यांदा औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेत असल्याने, त्यालाही एमआयएमकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या निर्णयानंतर खासदार इम्तियाज जलील यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


महत्वाची बातम्या


Maharashtra Cabinet : आज 'शिंदे-फडणवीस' सरकारची तिसरी कॅबिनेट; औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा निर्णय पुन्हा होणार


Aurangabad Renamed: नामांतरावरून जलील यांनी तरुणांची माथी भडकवू नयेत; संभाजी ब्रिगेड आक्रमक