(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: 'मला 'संज्या' म्हणणाऱ्या खैरेंना मी 'चंद्या' म्हंटले तर..'; संजय शिरसाट यांची खोचक टीका
Aurangabad; कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना आमदार संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे.
Aurangabad News: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत निर्माण झालेल्या दोन गटातील एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप काही थांबता थांबत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही गटातील नेते टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दरम्यान बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा अशीच काही टीका शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर केली आहे. मला 'संज्या' म्हणणाऱ्या खैरेंना मी 'चंद्या' म्हंटले तर काय होईल असा शब्दात शिरसाट यांनी खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिंदे गटातील आमदारांकडून सद्या बैठकांवर-बैठका सुरु आहे. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहे. औरंगाबाद शहरातील पश्चिम मतदारसंघात सुद्धा आमदार संजय शिरसाट आणि शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहे. अशाच एका बैठकीत बोलतांना शिरसाट यांनी खैरे यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले शिरसाट...
यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, मनात जे येईल त्या टीका माझ्यावर करण्यात आल्या.निष्ठा दाखवायची असेल तर दुसऱ्याला वाईट म्हणावेच लागते. पण खैरे साहेब यांच्या वयाचे मान ठेवून त्यांच्यावर टीका करायच्या नाहीत. मला संज्या म्हंटल्यावर दोन दिवसांनी एक शब्द तरी बोलले नाही. पण मला 'संज्या' म्हणणाऱ्या खैरेंना मी 'चंद्या' म्हंटले तर काय होईल टोला शिरसाट यांनी यावेळी लगावला.
दोन्ही गटातील वडा टोकाला...
शिंदे गटाने पुकारलेल्या बंडापासून दोन्ही गटातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सुरवातीला महत्वाच्या नेत्यांवर होणाऱ्या टीका आता स्थानिक पातळीवर येऊन पोहचल्या आहे. दोन्ही गटातील नेते आता एकमेकांच्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. कधीकाळी शिवसेनेत एकमेकांना सन्मान देणारे नेते टीका करतांना सर्व पातळी ओलांडून टीका करत आहेत. तर खरे शिवसैनिक आपणच असल्याचा दावाही दोन्ही गट करत आहे. त्यामुळे यापुढेही हा दोन्ही गटातील वाद आणखीच तापणार असल्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी: औरंगाबादच्या शिवसेनेच्या लोकसभा जागेवर 'भाजप'चा दावा
Aurangabad: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांना पोलिसांच्या नोटिसा