Aurangabad Rain Update: शुक्रवारी मध्यरात्री नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या वरील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची वरील आवक पाहता यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणाच्या नऊ आपत्कालीन दरवाजांपैकी सात आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले आहे. सध्या जायकवाडी धरणातून 80 हजार 524 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदावरी नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जायकवाडी धरणात सद्या 68 हजार 416 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
तब्बल 32 वर्षानंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणातील दरवाजे यावर्षी जुलै महिन्यात उघडण्यात आले होते. पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत तीन वेळा जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान यावर्षी पहिल्यांदाच शुक्रवारी नऊ आपत्कालीन दरवाजांपैकी सात दरवाजातून पाणी सोडण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे यापूर्वीचे 18 दरवाजे आणि आपत्कालीन सात दरवाजे असे एकूण 25 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी पात्रेत पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सध्याची परिस्थिती....
- पुर्ण संचय पातळी (FRL) : 1522.00 फुट
- सध्याची पाणी पातळी (WL) : 1521.74फुट
- जिवंत पाणी साठा (Live) : 2139.884 दलघमी (75.56 टिएमसी)
- एकुण पाणी साठा (Gross) : 2877.990दलघमी (101.62टिएमसी)
- पाण्याची आवक (Inflow):68416 क्युसेक्स
- पाण्याचा विसर्ग (Discharge) : 80524क्युसेक्स
- एकूण उघडलेले द्वार : 25 (7 दरवाजे आपत्कालीन)
महत्वाच्या बातम्या...
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात धुवांधार, एकट्या सिन्नर तालुक्यात 165 मिमी पावसाची नोंद
Maharashtra Rain : आजपासून पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार