Aurangabad Crime News: गणेशोत्सवाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिले असून, सर्व मंडळांकडून जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी बऱ्याचदा वर्गणी करून सोसायटी,गावात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील एका गावात गेल्यावर्षी जमा करण्यात आलेल्या वर्गणीच्या हिशोबावरून चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. वाद एवढा टोकाला गेला की गावातील तंटामुक्त अध्यक्षावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे रविवारी आगामी गणेशोत्सव, रामदेव बाबा भंडारा आणि देवीची यात्रा हे आगामी उत्सव साजरे करण्यासाठी सालाबादप्रमाणे नियोजन व वर्गणी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत सर्व गावकरी आणि गावातील प्रतिष्ठीत मिळून आगामी उत्सवाबाबत नियोजनाची रूपरेषा ठरवतात. याचवेळी गावातील तंटामुक्त गावसमितीचे अध्यक्ष रमेश चव्हाण हे ग्रामस्थांसमोर आपली भूमिका मांडत होते. दरम्यान गावातील बद्रीनाथ राठोड यांनी मागील वर्षीच्या वर्गणीचा हिशोब दिला नसून आधी तो हिशोब द्या अशी मागणी केली. 


थेट हाणामारी...


रमेश चव्हाण भूमिका मांडत असतानाच बद्रीनाथ राठोड यांनी गेल्यावर्षीचा हिशोब मागितला. त्याला उत्तर देतांना चव्हाण म्हणाले की, तुम्ही गेल्यावर्षी वर्गणीचं दिली नव्हती. भर गाव बैठकीत सर्व गावासमोर आपण वर्गणी दिली नसल्याचं चव्हाण यांनी म्हंटल्याने राठोड यांना राग आला. त्यामुळे त्यांच्यात आणि चव्हाण यांच्यात वाद सुरु झाला. याच वादात राठोड यांचा मुलगा किरण राठोड सुद्धा पडला. सुरवातीला एकमेकांना शिवीगाळ करणारे चव्हाण-राठोड काही वेळातच एकमेकांवर तुटून पडले आणि हाणामारी सुरु झाली. 


 टोकदार वस्तूने हल्ला...


मागील वर्षी तुम्ही वर्गणीच दिली नसल्याचे रमेश चव्हाण यांनी सांगितल्यावर याचा मनात राग धरून बद्रीनाथ राठोड व किरण राठोड या पिता पुत्रांनी हातातील टोकदार वस्तूने रमेश चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. सोबतच उर्वरित दोघांनी रमेश यांना बेदम मारहाण केली. यात रमेश चव्हाण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून राठोड पिता पुत्रांसह चौघांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नांदगाव तांड्यावर धाव घेतली. 


महत्वाच्या बातम्या...


Crime: कुस्तीच्या आखाड्यातचं भिडले दोन गट; मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही...Crime: कुस्तीच्या आखाड्यातचं भिडले दोन गट; मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही...


Aurangabad: अग्निवीर सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून लुट?; व्हिडिओ व्हायरल