Aurangabad News: जुन महिन्यात पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलैच्या सुरवातीपासून मराठवाड्यात हाहाकार माजवला आहे. 8 जुलै ते 24 जुलैपर्यंत मराठवाड्यातील182 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जाणार आहे. एकनाथ शिंदे हे 30 जुलैरोजी औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान ते मराठवाडा विभागाच्या पीकनुकसानीचा आढावा घेणार आहे. 


विरोधीपक्ष नेतेही मराठवाडा दौऱ्यावर...


विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शनिवार 30  जुलै रोजी नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. आपल्या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत. दरम्यान राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन त्वरीत बोलावण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे. 


असा असणार मुख्यमंत्र्यांचा दौरा...


मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सिल्लोड येथे सभा घेणार आहे. सिल्लोड येथील नगर परिषदेच्या मैदानात ही सभा असणार आहे. तर पोलिसांकडून सुद्धा या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. तर याचवेळी शिंदे हे वैजापूर येथे सुद्धा भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील बाजाठाण फाट्यावर नवीन साखर कारखान्याचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रमेश बोरणारे यांनी दिली आहे. याचवेळी ते मराठवाडा विभागाच्या पीकनुकसानीचा आढावा सुद्धा घेणार आहे. 


आणखी महत्वाच्या बातम्या...


Marathwada Rain : मराठवाड्यात पावसामुळं आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू, तर 3 लाख 78 हजार 866 हेक्टरवरील पिकांचं नुकसान


मराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना अतिवृष्टीचा फटका; पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल