Marathwada Anganwadi: कोरोना सारख्या महामारीनंतर मराठवाड्यातील पालकांचा इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश देण्याएवजी मुलांना मराठी माध्यमांमध्ये प्रवेश घेण्यावर भर पडला आहे. त्यातच मुलांना अंगणवाडीत पाठवण्याचा आकडाही वाढला आहे. एकीकडे नर्सरी,के.जी, प्रेपमध्ये प्रवेश देण्याचे पर्याय उपलब्ध झाले असताना पालकांनी मात्र आता अंगणवाड्यांना पसंती दिली आहे. गतवर्षाच्या तुलनेत मराठवाड्यात 13 हजार 390 विद्यार्थ्यांची संख्या अंगणवाड्यांमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले आहे.
यामुळे वाढली विद्यार्थ्यांची संख्या...
कोरोनानंतर अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नर्सरी, के.जी, प्रेपमध्ये प्रवेश घेणं अनेक पालकांसाठी शक्य नाही. त्यातच मराठवाड्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये तेथील जिल्हास्तरीय पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना दिला जातो. यात सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना घरपोच गहू, हरभरा, मसूरडाळ, मीठ, मिर्ची, हळद, साखर देण्यात येते. तर तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाडीतच ताजा आहार ज्यात खिचडी, चिक्की, उसळ, लाडू असे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ शिजवून तयार करून दिले जातात. विशेष म्हणजे हे सर्वमोफत प्रवेशासह मिळते. त्यामुळे पालकांचा ओघ अंगणवाड्यांकडे वाढला आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी...
अ.क्र. | जिल्हा | अंगणवाड्या | विद्यार्थी |
1 | औरंगाबाद | 3840 | 176369 |
2 | जालना | 2191 | 191617 |
3 | परभणी | 1837 | 152572 |
4 | हिंगोली | 1197 | 116178 |
5 | बीड | 3260 | 354054 |
6 | लातूर | 2591 | 200556 |
7 | उस्मानाबाद | 2019 | 143796 |
8 | नांदेड | 4161 | 304843 |
एकूण | -- | 21019 | 1661070 |
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Aurangabad: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेतही शिंदे गट प्रती शिवसेना भवन बनवणार
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI