Dasara Melava: पहिल्यांदाच मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरे मेळावे पार पडणार असून, ज्यात एक उद्धव ठाकरे यांचा शिवाजीपार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर  दसरा मेळावा होणार आहे. यासाठी दोन्ही गटातील कार्यकर्ते आणि नेते मुंबईत दाखल होत आहे. दरम्यान औरंगाबादच्या विमानतळावरुन 70 शिवसैनिक सकाळच्या विमानाने मुंबईमध्ये दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. तर याचवेळी याच विमानातून शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकत्र प्रवास केला. यावेळी त्यांच्यात काही गप्पा सुद्धा रंगल्या. 


औरंगाबाद ते मुंबई या सकाळच्या विमानाने दानवे आणि भुमरे मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या आजूबाजूलाच होत्या. या दोन्ही नेत्यांचा एकत्र प्रवासाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात दोघांमध्ये दैनिक सामनावरून जुगल बंदी पाहायला मिळाली. ज्यात भुमरे म्हणतायत की, सामना दैनिकाची आम्हाला गरज आहे, तुम्हला काय...याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेला व्यक्ती म्हणतो, आज काय लिहलं आहे पहावं लागेल...दोन्ही नेत्यांच्या संवादाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
  
औरंगाबादमधून शिंदे गटाच्या 500 बस रवाना....


शिंदे गटाचे नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबईत होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी तब्बल 500 बस बुक केल्या आहेत. यामध्ये साडेतीनशे एसटी महामंडळाच्या बसेस असून,बाकी खाजगी बसेस बुक करण्यात आल्या आहे.  आज पहाटे अब्दुल सत्तार हे आपल्या सर्व समर्थकांना घेऊन बीकेसी मैदानात दाखल झाले आहे. तर काही शिवसैनिक विमानाने देखील मुंबईत पोहोचत आहेत. औरंगाबादच्या विमानतळावरुन 70 शिवसैनिक सकाळच्या विमानाने मुंबईमध्ये दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. 


पाचही आमदारांकडून जोरदार तयारी...


शिंदे गटाचे औरंगाबादमध्ये पाच आमदार असून, ज्यात दोन कॅबिनेट मंत्री आहे. तर मुंबईत होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याची विशेष जबाबदारी औरंगाबादवर होती अशी चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या पाचही आमदारांनी जोरदार तयारी केली असून, कार्यकर्त्यांना मुंबईत जाण्यासाठी व्यवस्था करून दिली आहे. एकट्या अब्दुल सत्तार यांच्याकडून 500 बसेस बुक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर इतर आमदारांनी चारचाकी गाड्यांची व्यवस्था केला असल्याचे बोलले जात आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Dasara Melava 2022 Live Updates : दोन्ही गटांकडून जय्यत तयारी, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे काय बोलणार?


Dasara Melava: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या रॅलीला सुरवात; गोपीनाथगड ते भगवान भक्ती गडपर्यंत निघणार...