Aurangabad Accident : औरंगाबाद शहरातील औरंगपुरा भागात झालेल्या एका अपघातात शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. सिटी बसमध्ये प्रवास करतांना बस चालक गाडी मागे घेत असतानाच, या मुलाने खिडकीतून डोकं बाहेर काढल्याने लोखंडी पोलच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला आहे. इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेला हरिओम राधाकृष्ण पंडित (वय 15 वर्षे, रा. मोहटादेवी, बजाजनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत बस ताब्यात घेतली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी साडेबारा वाजता औरंगाबाद महानगरपालिकेची स्मार्ट सिटी बस औरंगपुरा येथून (MH 20EG 9862) औरंगपुरा ते साजापूर जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान हरिओमची शाळा सुटल्याने तो घरी जाण्यासाठी बसमध्ये बसला होता. बसचा निघण्याचा वेळ झाल्याने बस चालक कपिल लोखंडे यांनी बस जिल्हा परिषद मैदानातून वळवण्यासाठी माघे घेतली. यावेळी बसमध्ये बसलेल्या हरिओम पंडित याने खिडकीतून डोकं बाहेर काढलं. यावेळी मैदानाच्या गेटचा पोल त्याच्या डोक्याला लागला. 


गंभीर जखमी झाल्याने मृत्यू...


बस मागे घेत असतानाच हरिओमने डॉक खिडकीतून बाहेर काढलं. यावेळी सिमेटचा पोल आणि त्याला लावण्यात आलेल्या गेटचा लोखंडी पोल जोरात हरिओमनच्या डोक्याला लागला. थेट डोक्याला जोराचा दणका बसल्याने हरिओमनच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे काही क्षणात तो गाडीच्या सीटवर कोसळला. चालकाच्या लक्षात येताच त्याने हरिओमनला तत्काळ रुग्णालयात हलवले. पण डोक्याला जोराचा मार लागल्याने आणि मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 


पोलिसांकडून पंचनामा...


या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघातस्थळी पंचनामा केला आहे. अपघातग्रस्त बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पुढील तपास क्रांती चौक पोलिसांकडून करण्यात येत आहे. सोबतच या याप्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद सुद्धा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे एक मोठी शाळा असून, शाळकरी मुलांची वर्दळ असते. त्यामुळे या अपघातनंतर मुलांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. 


महत्वाच्या बातम्या...


Lumpy: औरंगाबादेत लम्पीचा साठा संपला, सुमारे वीस हजार जनावरे अजूनही लसीकरणापासून वंचित


Aurangabad News : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या महिलेवर काळाचा घाला; अपघातात गमावला जीव