Marathwada Rain News: यंदा जुलै महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मराठवाड्यात (Marathwada) अनेक भागात अतिवृष्टी (Heavy Rain) सुद्धा पाहायला मिळाली. त्यातच आता परतीच्या पावसाने जोरदार धुमाकूळ घातल्याने अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतांना पाहायला मिळाले. त्यामुळे यावर्षी मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत 100 मिलिमीटर अधिकचा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान 679 मिलिमीटर असून, त्याच्या तुलनेत आत्तापर्यंत 772 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे 114 मिलिमीटर अधिकच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस...
जिल्हा | वार्षिक सरासरी | झालेला पाऊस |
औरंगाबाद | 581 मिलिमीटर | 661 मिलिमीटर |
जालना | 603 मिलिमीटर | 785 मिलिमीटर |
बीड | 566 मिलिमीटर | 673 मिलिमीटर |
लातूर | 706 मिलिमीटर | 740 मिलिमीटर |
उस्मानाबाद | 603 मिलिमीटर | 670 मिलिमीटर |
नांदेड | 814 मिलिमीटर | 1046 मिलिमीटर |
परभणी | 761 मिलिमीटर | 650 मिलिमीटर |
हिंगोली | 795 मिलिमीटर | 890 मिलिमीटर |
एकूण | 679 मिलिमीटर | 779 मिलिमीटर |
अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका...
नेहमी कोरडा दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता परतीच्या पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कापूस,सोयाबीन सारख्या पिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कापूस वेचणीला असतांना पावसाने भिजत आहे. तर सोयाबीनला अधिकच्या पावसाने कोंब फुटत आहे.
महत्वाच्या बातम्या...
Maharashtra Rain Update : राज्यात मध्यम पावसाची शक्यता, विदर्भासह मराठवाड्यालाही झोडपणार