Marathwada Rain Update: गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढतांना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4  सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे.

जुलै महिना आणि ऑगस्टच्या सुरवातीला झालेल्या पावसानंतर मोठा खंड पडला होता. त्यामुळे पाण्याअभावी पिकं माना टाकत होती. काही ठिकाणे पिकांचे पाते पिवळी पडायला लागली होती. अशात शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. मात्र तब्बल 15 दिवसांपेक्षा अधिकचा काल उलटूनही पाऊस पडत नसल्याचे चित्र होते. अशात शुक्रवारपासून पुन्हा एकदा वरुणराजाने दमदार हजेरी लावत पिकांना जीवदान दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस (1 ते 4  सप्टेंबरपर्यंत पाऊस)

जिल्हा  अपेक्षित पाऊस  प्रत्यक्षात पाऊस  टक्केवारी 
औरंगाबाद   15.1 30.4 202
जालना  14.2 31.9 225
 बीड  17.2 30.9 179.7
लातूर  18.1 29.0 160.9
 उस्मानाबाद  18.5 38.3 207.4
परभणी  16.9 6.5 38.5
नांदेड  16.7 2.4 14.3
हिंगोली  15.5 9.9 64.0
एकूण  16.6 21.5 129.5


काही भागात नुकसानही...

पंधरा दिवसांनी परतलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरीही काही भागात मात्र याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कारण औरंगाबादसह काही जिल्ह्यात पावसाच्या सरीसोबतच वादळी वाराही पाहायला मिळाला. त्यामुळे पिके अक्षरशः आडवी पडली आहे. तर काही ठिकाणी पिकात गुडगाभर पाणी साचले आहे. त्यामुळे परतलेल्या पावसाचा काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 

पावसाच्या बातम्या...

Rain Update: आधी पाण्याअभावी पिकं वाळली, आता तुफान पावसानं उरलीसुरली पिकं वाहून गेली; लातूरमध्ये मुसळधार

Jalna Rain : जालना जिल्ह्यात वादळी पाऊस, ऊसासह कापूस आणि मोसंबीला फटका, शेतकरी चिंतेत