Jalna Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. मागील दोन ते तीन दिवसापूर्वी पावसाचा जोर कमी झाला होता, मात्र आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात तीन मंडळात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची ऊस, कापूस याबरोबरच मोसंबी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.


शेतकऱ्यांना मोठा फटका


अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालना जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांवरच वादळ आणलं. वादळी पावसामुळं ऊस अक्षरशः आडवा झाला असून, अनेक शेतकऱ्यांची मोसंबीची झाड मुळासकट उन्मळून पडली आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री, शहागड, गोंदी या भागात पावसाबरोबर वादळाचा जोरदार तडखा बसला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे हा वादळी पाऊस मात्र मोठं नुकसान करून गेला आहे. यामुळं या भागातील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.


सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा शेती पिकांना फटका


कमी झालेला पावसाचा  जोर राज्यात पुन्हा वाढला आहे. राज्याच्या विविध भागात कालपासून पावसानं चांगली हजेरी लावली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात देखील काही भागात चांगला पाऊस झाला आहे.  सोलापूर शहरासह अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील काही गावात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग पाहायाला मिळाली. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळं ऊसाचे उभे पीक आडवे झाले आहे. तर दुसऱ्या पिकांनी देखील या मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.  त्यामुळ शेतकरी चिंतेत आहेत.


ऊसासह तूर पिकाला फटका


सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, सलगर, नावदगी, गौडगाव, खानापूर, म्हैसलगी या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. उभ्या पिकात पाणी साचलं आहे. तर दुसरीकडं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं ऊसाचे पिक आडवे झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच काही ठिकाणी तूर पिकाचे देखील मोठं नुकसान झाले आहे. संपूर्ण तूर पाण्याखाली गेल्याने त्यातून उत्पादन निघम्याची कमी शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: