Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) उस्मानपुरा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. बहिणीसोबत लव्ह मॅरेज का केले, असा जाब विचारुन मेव्हण्याने भावोजीवर हल्ला करत चाकूने भोसकल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना उस्मानपुरा परिसरातील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर, देवगिरी वसतिगृहाजवळ घडली आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद उत्तम त्रिभुवन (वय 26 वर्षे, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) असे जखमी तरुणाचे नाव आहे.


आनंद त्रिभुवन याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो डीजेच्या गाडीवर कामाला आहे. त्याचे यापूर्वी एक लग्न झालेले असून, त्याला दोन मुले देखील आहेत. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी त्याने एका मुलीशी लव्ह मॅरेज केले. ते दोघेही आता सोबत राहत आहेत. तर 19 फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता त्रिभुवन हा डीजेच्या गाडीवर चालक म्हणून काम करत असताना, त्याने लव्ह मॅरेज केलेल्या तरुणीचा भाऊ विशाल किशोर सौदागर हा तिथे गेला. 


विशाल किशोर सौदागरने आनंद त्रिभुवनला तू गाडीच्या खाली ये, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून खाली उतरवले. त्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेजसमोर देवगिरी वसतिगृहाजवळ गेटमध्ये घेऊन गेला. तिथे तू माझ्या बहिणीसोबत लव्ह मॅरेज का केले, असा जाब विचारल्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्याचवेळी विशाल सौदागर याने आनंद त्रिभुवनच्या पोटात चाकू खुपसला. हा घाव ओझरता लागल्याने आनंद थोडक्यात बचावला. त्याच्या पोटाला टाके देण्यात आले आहेत. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


थोडक्यात बचावला! 


आपल्या बहिणीसोबत आनंद त्रिभुवने लव्ह मॅरेज केल्याने याचा राग विशाल सौदागरच्या मनात होता. त्यामुळे आनंदचा काटा काढण्याचे त्याच्या डोक्यात होते. दरम्यान ठरल्याप्रमाणे त्यान आनंदला पॉलिटेक्निक कॉलेजसमोर देवगिरी वसतिगृहाजवळ गेटमध्ये घेऊन गेला. सुरुवातीला माझ्या बहिणीसोबत लव्ह मॅरेज का केले, असा जाब विचारत त्याने आनंद त्रिभुवनशी वाद घालायला सुरुवात केली. मात्र काही वेळाने सोबत आणलेल्या चाकूने हल्ला करत, थेट आनंदच्या पोटात चाकू खुपसला. पण हा घाव ओझरता लागल्याने आनंद थोडक्यात बचावला आणि मोठा अनर्थ टळला. तर आनंदवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Student Suicide: धक्कादायक! परीक्षेच्या एक दिवस आधी बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या