एक्स्प्लोर

Student Suicide: धक्कादायक! परीक्षेच्या एक दिवस आधी बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Aurangabad Student Suicide: याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Aurangabad Student Suicide: आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत असून, त्यापूर्वीच औरंगाबाद शहरात (Aurangabad City) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीची परीक्षा (HSC Exam) काही तासांवर आलेली असताना एन-8 सिडको भागातील गुरूनगर हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. सोमवारी दुपारी ही उघडकीस आली. दरम्यान या विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांसह नातेवाइकांनी वर्तविला आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमन रवींद्र आहेरेवाल (वय 18, रा. एन 8, गुरूनगर हौसिंग सोसायटी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन आहेरेवाल हा कुलभूषण गायकवाड महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला असून, एक भाऊ पुण्यात नोकरी करतो. दरम्यान बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने तो या परीक्षेची तयारी करत होता. मात्र परीक्षेला अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक राहिला असताना अमनने टोकाचे पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. रविवारी सायंकाळी जेवण केल्यानंतर अमन आपल्या तिसऱ्या मजल्यावरील अभ्यासाच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मात्र तो सोमवारी सकाळी खाली आलाच नाही. दुपारी जेवणासाठी आजोबा अमनला बोलावण्यासाठी गेले असता, अमना फासावर लटकलेला दिसला. त्यास नातेवाइकांनी बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

दरम्यान अमनने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याचा त्याने आधीच निर्णय घेतला होता आणि रविवारी रात्री आत्महत्या करण्याची तयारी केली. अमनने पहिल्या मजल्यावरून अॅल्युमिनिअमची शिडी तिसऱ्या मजल्यावरील त्याच्या अभ्यासाच्या खोलीत घेऊन गेला होता. त्याच शिडीच्या सहाय्याने त्याने छताच्या हुकाला ओढणी बांधून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या! 

दरम्यान एकीकडे बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असतनाच, जिल्ह्यातील पाचोड परिसरात एका तरूण शेतकऱ्याने देखील आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. सततच्या नापिकीमुळे झालेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून पैठण तालुक्यातील वडजी गावातील 26  वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या टोकाचे पाऊल उचलले आहे. सततच्या नापिकीमुळे आलेल्या नैराश्यातून स्वतःच्या शेतात जाऊन या तरुणाने विषारी द्रव्य सेवन करुन मृत्यूला कवटाळले आहे. सोमवारी (20 फेब्रुवारी) रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. अक्षय दिलीप गोजरे (वय 26 वर्षे, वडजी, ता. पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

धक्कादायक! तृतीयपंथीयाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या; औरंगाबादेतील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget