Aurangabad Crime : औरंगाबाद शहरातील एक पोलीस ठाणे उडणार अशी धमकी देणारा कॉल औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फोन करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. मात्र तोपर्यंत पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून या आरोपीला ताब्यात घेऊन त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम वैभव काळे ( वय 23 वर्षे रा. आण्णाभाऊ साठे पुतळया जवळ, संजयनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी पोलीस नियंत्रण कक्ष डॉयल 112 वर अज्ञात व्यक्तीने  फोनव्दारे 11.59 ते 14.02  वाजेच्या दरम्यान औरंगाबाद शहरातील कोणतेही एक पोलीस ठाणे उडणार अशी धमकी देणारा कॉल केला. विशेष म्हणजे हा फोन तब्बल चार वेळा आला. अशाप्रकारे धमकी देणारा कॉल आल्याने घटनेचे गांभीर्य पहाता तात्काळ गुन्हे शाखेचे तीन पथक तपासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक माहीती वरुन सदर मोबाईलधारकांचे नांव शुभम वैभव काळे असल्याचे समोर आले. 


पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध घेत त्याला MIDC चिकलठाणा परिसरातून ताब्यात घेतले. तसेच पुढील कार्यवाहीसाठी बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे त्याने अशाप्रकारे  धमकी का दिली याचा शोध पोलीस घेत आहे. तर पोलीसांना खोटी माहीती देणारे व अफवा पसरविणाऱ्याविरुध्द औरंगाबाद पोलिसांकडून कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन औरंगाबाद शहर पोलीस मार्फत करण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या...


Photo : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांचे पथसंचलन


Crime Story: आधी जेवणासाठी घेऊन गेले, त्यानंतर बील देत नाही म्हणून अपहरण केले