Aurangabad News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा असल्याची टीका मनसेचे जेष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता शिवसनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिले आहे. प्रकाश महाजन यांची अवकात काय?, त्यांची सर्व लफडी मला माहित असून, यापुढे त्यांनी असं बोलू नयेत असा इशारा खैरे यांनी दिला आहे.
काय म्हणाले खैरे...
प्रकाश महाजन यांचे विधान म्हणजे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. प्रकाश महाजन पूर्वी शिवसेनेत होते. या पक्षातून त्या पक्षात जाण्याची त्यांची सवय आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ असून, त्यांच्याबद्दल त्यांनी असं बोलू नयेत. प्रकाश महाजन यांना आम्ही सरळ करू असं खैरे म्हणाले. तर यांची परिस्थिती काय आहे. या माणसाच्या भावाने प्रमोद महाजन यांची हत्या केली. यांचे कुटुंबचं असे आहे. आपल्या मोठ्या भावाला भाऊ मारून टाकतो. यांची काय अवकात आहे. प्रकाश महाजनचे सगळे लफडे, प्रकरण मला माहित आहेत. त्यामुळे त्यांनी यापुढे असे बोलू नयेत,असा इशारा खैरे यांनी दिला.
काय म्हणाले होते प्रकाश महाजन...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत नुकताच प्रसिद्ध झाली आहे. यावर बोलतांना प्रकाश महाजन म्हणाले की, महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी काळू-बाळूचा तमाशा फार प्रसिद्ध होता. मला त्याची थोडी आठवण झाली. यांनी इकडून जय महाराष्ट्र म्हंटल की त्यांनी तिकडून त्यांनी जय महाराष्ट्र म्हणायचं आणि मग ही जय महाराष्ट्राची गर्जना आहे. जय महाराष्ट्र म्हणतांना मांजर तरी जोराने म्याव म्हणते असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडत होतं,अशी टीका महाजन यांनी केली होती.
नामांतरबाबत जयंत पाटलांना भेटणार...
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका टाकली आहे. यावर बोलतांना खैरे म्हणाले की, याचिका करणारा हा तोच व्यक्ती आहे ज्यांनी, यापूर्वी देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मी जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या या कार्यकर्त्याला आवर घाला म्हणून मागणी करणार असल्याचं खैरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad : औरंगाबादच्या नामांतराचा वाद उच्च न्यायालयात, याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी
Aurangabad: मराठवाड्यातील पीकनुकसानीचा मुख्यमंत्री घेणार आढावा; अजित पवारांचाही पाहणी दौरा