Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) कन्नड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. कन्नड शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या प्रियंका बारकू वायडे (वय 23) या तरुणीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे लग्न (Marriage) निश्चित झाले असून, येत्या चार जानेवारीला तिचा साखरपुड्याचा (Engagement) कार्यक्रम होता. मात्र त्यापूर्वीचं तिने टोकाचे पाऊल उचलेले.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, घरात आई-वडील नसताना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रियंकाने घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून मागील दरवाजाने घरात प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाची कडी आतून लावून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी प्रियंकाची आई मुलाला शाळेतून आणून घरी गेल्या असता दरवाजाला कुलूप दिसले. त्यांनी शेजाऱ्यांकडे मुलीने चावी ठेवली आहे का, अशी विचारणा केली. मात्र कुणाकडेही चावी ठेवलेली नव्हती. त्यानंतर त्यांनी पतीला फोन करून घराला बाहेरून कुलूप लावलेले असून, प्रियंका घरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते तात्काळ घरी आले. त्यानंतर खिडकीतून डोकावून पाहिले असता, किचनमधील पंख्याला प्रियंकाने गळफास घेतल्याचे दिसून आले.
डॉक्टरांनी मृत घोषित केले
प्रियंकाने गळफास घेतल्याचे दिसून येताच तिच्या वडिलांनी शेजारी राहणारे नारायण टेकाळे महाराज, भगवान चौथे, विजय चौथे, अजय चौथे, नीलेश भवर, किरण राठोड यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. प्रियंकाला खाली उतरवत रिक्षाने तत्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रियंकाला तपासून मृत घोषित केले. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला...
जैतापूर येथे बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रियंकाचे लग्न ठरले होते. येत्या 4 जानेवारीला साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण तयारी देखील करून ठेवली होती. तर अनेक नातेवाईकांना आमंत्रण देखील देण्यात आले होते. अवघ्या सात दिवसांवर साखरपुडा येऊन ठेपला असतानाच प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. तर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मित्राची दिल्लगी करणं महागात पडलं; तू आमदार झाला का? म्हणताच केली बेदम मारहाण