Maharashtra Jalna News : दादर जनशताब्दी (Janshatabdi Express) एक्स्प्रेस चालकाच्या सतर्कतेमुळे औरंगाबादच्या चिखलठाणा येथे एका महिलेचा जीव वाचला. महिला रेल्वेच्या रुळावर असल्याचं लक्षात आल्यानंतर लोकोपायलटनं ब्रेक लावत महिलेला वाचवलं आहे. अंगावरुन ट्रेन जात असतानाही महिला रेल्वे रुळांवर झोपून राहिली होती. जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या खाली आल्यामुळे महिलाच्या जीवावर बेतलं असतं. मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हे संकट टळलं आणि रेल्वेखाली आलेल्या महिलेचे प्राण वाचले.
चिकलठाणा-औरंगाबाद दरम्यान मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली. ताशी 100 किलोमीटरचा वेग असतानाही महिलेच्या अंगावरुन गेल्यानंतर अवघ्या 500 मीटर अंतरावरच रेल्वे थांबवण्यात चालकाला यश आलं. इंजिनसह चार डबे पुढे गेल्यानंतर रेल्वे थांबली. मात्र सुदैवाने महिलेला फारशी दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर जनशताब्दी एक्स्प्रेस 13 मिनिटं घटनास्थळी थांबून राहिली होती. त्यानंतर ती पुढे औरंगाबादकडे रवाना झाली.
जालन्याहून सीएसटीपर्यंत जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस मुकंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचली, त्यावेळी एका महिलेनं ट्रेनसमोर उडी घेतली. परंतु, चालकाच्या प्रसंगावधानामुळं महिलेचा जीव वाचला. महिलेला उडी घेताला पाहताच चालकानं इमरजन्सी ब्रेक लावला. परंतु, ट्रेनचे 4 डब्बे महिलेच्या वरुन गेले. पण तिचा जीव वाचला. आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी महिलेला रेस्क्यू केलं आणि RPF च्या कस्टडीमध्ये दिलं. दरम्यान, RPF नं महिलेच्या पतीशी संपर्क साधत तिला बोलावलं आणि त्याच्या ताब्यात दिलं. परंतु, महिलेनं ट्रेनसमोर उडी का घेतली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona And Criminal : कोरोना काळात तुरुंगातून पेरोलवर सोडलेले कैदी तुरुंगात परतलेच नाही, नागपूर पोलिसांचे वाढले टेन्शन!
- भयंकर! पती-पत्नीच्या भांडणातून सहा मुलांची हत्या, महाड हादरलं
- Matheran Shuttle Service : माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; मिनीट्रेनच्या शटल सेवेचा विस्तार वाढवला, जाणून घ्या
- लालपरी आता नव्या रूपात; एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' 1 जूनपासून धावणार