Matheran Shuttle Service : माथेरानच्या थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. येथे येणाऱ्या पर्यटकांना माथेरान ते दस्तुरी नाका या मिनीट्रेन मधून प्रवास करण्याची इच्छा असते. त्यासाठी मिनीट्रेन च्या शटल सेवेच्या गाड्यांचा विस्तार करण्यात आला आहे.  माथेरान विभागातील 4 अतिरिक्त शटल सेवा 31 मे 2022 पर्यंत चालवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता या सेवामध्ये विस्तार करण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर


मिनीट्रेनच्या शटल सेवेचा विस्तार वाढवला


माथेरानचे पर्यटन हे मिनी ट्रेनवर अवलंबून असते. दरम्यान माथेरान विभागातील सोमवार ते शुक्रवार अमन लॉज आणि माथेरान विभागातील 4 अतिरिक्त शटल सेवा 31 मे 2022 पर्यंत चालवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता या सेवामध्ये विस्तार करण्यात आला आहे. प्रवाशांच्या फायद्यासाठी, आता सेवांचा विस्तार 15 जून 2022 पर्यंत करण्यात आला आहे. यामुळे माथेरानच्या पर्यटनात आणखी भर पडणार आहे.  याबाबत अधिकारी शिवाजी सुतार यांनी माहिती दिली आहे.


 






प्रवाशांकडून मागणी


लॉकडाऊन काळात पर्यटकांना माथेरानमध्ये बंदी झाल्यानंतर काही दिवसांत माथेरान-अमन लॉज शटल सेवाही बंद करण्यात आली होती.मिनीट्रेनच्या शटल सेवेबाबत बर्‍याच पर्यटकांना तक्रार होती, या ट्रेनच्या डब्ब्यांची संख्या कमी असल्यामुळे शटल सेवेचा लाभ घेता येत नव्हता. त्याकरिता शटल सेवा ही आठ डब्यांची करण्यात यावी तसेच शनिवार रविवार प्रमाणे सोमवार ते शुक्रवार शटल सेवेच्या कमीतकमी दहा अप आणि दहा डाऊन अशा सेवा तात्काळ चालू करण्याची अशी मागणी देखील प्रवाशांकडून करण्यात आली होती.