Maharashtra Politics: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठा दावा केला असून,काँग्रेस पाठिंबा काढणार आणि महाविकास आघाडीच सरकार पडणार असे राज्याचे चित्र असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर अडीच वर्षांसाठी आम्ही सत्ता बनवणार असेही आठवले म्हणाले. औरंगाबाद येथील विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी असे म्हटले आहे. 


महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षात सर्वकाही अलेबल नसल्याच चित्र असून, सत्तेतून बाहेर पडण्याची हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, काँग्रेस पाठिंबा काढणार आणि तीन पक्षाचं  सरकार पडणार असे राज्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसने पाठिंबा काढला तर अडीच वर्षासाठी आम्ही सत्ता बनवणार असेही आठवले म्हणाले. शिवसेनेला अडीच वर्षाचा आम्ही फॉर्म्युला दिला होता, पण त्यांनी धोका दिला असल्याचं आठवले म्हणाले.


सहाव्या जागेवर आमचाच विजय... 


राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. भाजपचा उमेदवार निवडून येणार असल्याने आम्हाला घोडेबाजार करण्याची गरज नाही. विजयासाठी लागणार संख्याबळ सुद्धा आमच्याकडे आहे. सातवा उमेदवार आधी आम्ही टाकला नाही, त्यांनी टाकला. त्यामुळे आम्हालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तसेच सर्व अपक्ष आमदार आमच्यासोबत आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे ते आम्हाला मतदान करू शकतात, असेही आठवले म्हणाले.


संभाजीराजेंनी भाजपकडे मागणी केली नाही... 


राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे यांनी घेतलेल्या माघारवर बोलताना आठवले म्हणाले की, संभाजीराजे यांना भाजपने एकदा संधी दिली होती. मात्र शिवसेनेने शब्द पाळला नाही आणि त्यांना धोका दिला. राजे पहिल्यापासून आमच्या सोबत राहिले नाही. त्यांनी भाजपकडे मागणी केली नाही. सुरवातीपासून अपक्ष राहण्याच त्यांच्याकडून सांगितले गेले. त्यामुळे संभाजीराजेंना भाजपने नक्की काहीतरी दिले असते, असं आठवले म्हणाले.


भाजप कुणाला पैसे देत नाही... 


लोकसभा निवडणुकीत भाजपने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमला एक हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला असल्याचं म्हटल्यावर आठवले म्हणाले, खैरे माझे मित्र आहेत. मात्र भाजप कुणालाच पैसे देत नाही,त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही, असं आठवले म्हणाले.