गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचा गराडा, औरंगाबाद दौऱ्यावर असतानाचा फोटो व्हायरल
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो सध्या चर्चे आहे. गृहमंत्री यांच्या भोवती असणाऱ्या तीनही गुन्हेगारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

औरंगाबाद : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गृहमंत्र्याच्या शेजारी उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे. दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे. तर अन्य एकावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी आरआर पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो समोर आला होता. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला. मात्र येथे गुन्हेगारांच्या मधेच गृहमंत्री असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहे. तर सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. या तिघांवर औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे तो बराचकाळ जेलमध्ये होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील पोलीस हातकड्या घालून हजेरी लावत होता.
कोण आहेत हे तिन गुन्हेगार?
कलीम कुरेशी औरंगाबाद शहरात याची गुटखा किंग म्हणून ओखळ आहे. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये देखील याची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
सय्यद मतीन बलात्कार, यासह अन्य गुन्हे या मतीनवर दाखल आहेत. तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित आहे.
जफर बिल्डर हा 500 ट्रक चोरून सुटे करून विकणाऱ्या टोळीतील गुन्हेगार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
