Aurangabad Electric Bikes Latest News : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मोटारसायकल येत आहेत. बाईकचे प्रमाण वाढले असले तरी अद्याप आपल्याकडे चॅर्जिंग स्टेशन तितके उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या घेणं टाळतात. कारण, बाईक चालवत असनाता मध्येच जर चार्जिंग संपली अथवा बॅटरीमध्ये काही अडचण निर्माण झाली तर काय करायचं? असा प्रश्न प्रत्येकासमोर उपस्थित राहतो. याचेच उत्तर औरंगाबादमधील एका तरुणाने शोधले आहे. औरंगाबादच्या या रँचोची सध्या मराठवाड्यात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. औरंगाबादमधील अफरोज शेख या तरुणाने एकाच बाईकमध्ये बॅटरी आणि पेट्रोल असा दुहेरी संगम साधला आहे. बॅटरी संपली तर पेट्रोलचा वापर अन् पेट्रोल संपले तर बॅटरी... अशी दुचाकी त्याने तयार केली आहे. यासाठी त्याला 17 हजार रुपयांचा खर्च आला आहे.
अफरोज शेख याने तयार केलेल्या या बाईक इलेक्ट्रिक बाईक म्हणू शकतात आणि पेट्रोलही बाईकही. औरंगाबादच्या या पठ्याने अशी भन्नाट बाईक बनवली आहे. अफरोजने भंगारातून तीन हजार रुपयांना एक बाईक विकत घेतली होती. या गाडीवर त्याने 17 हजार रुपयांचा खर्च केला. अफरोज याने तयार केलेली बाईकमधील एखाद्यावेळी जर बॅटरी संपली तर बाईक पेट्रोलवर आणि पेट्रोल संपलं तर चार्जिंगवर चलते.
नेमकी ही दुचाकी आहे तरी कशी?
अफरोज शेख याने तीन हजारात भंगारातून जुनी दुचाकी घेतली. त्यावर 17 हजार रुपयांचा खर्च केला. म्हणजेच 20 हजार रुपयात दुचाकी तयार झाली. बॅटरी आणि पेट्रोलवर चालणारी ही दुचाकी तयार करण्यासाठी अफरोजला तीन महिन्याचा कालावधी लागला. तीन तास चार्जिंग केल्यानंतर ही बाईक 20 किमीपर्यंत चालते. तर पेट्रोलवर ही गाडी 45 ते 50 चा आव्हरेज देते. महिंद्रा, बजाज, टीव्हीएस, होंडा, या कोणत्याही प्रकारच्या गाड्यांमध्ये आपण ही टेक्नॉलॉजी वापरु करू शकतो. ज्या पंधरा वर्षानंतर गाड्या स्क्राप होत आहेत, त्यांच्या जर chasis वगैरे सगळं सामानाचा वापर केला तर ते इलेक्ट्रिक बाईक ची किंमत आपण ५०% पर्यंत आपण कमी करू शकतो, असे अफरोज याने सांगितले.
सध्या बाजारात अनेक इलेक्ट्रिक बाईक आल्या आहेत, पण अशा बाईकची चार्जिंग संपली किंवा बॅटरीमध्ये अडचण आली तर दुचाकी बंद पडते. पण अफरोजने तयार केलेली ही बाईकची चार्जिंग संपली किंवा बॅटरी बंद पडली तरीही चिंता करायची गरज नाही, कारण पेट्रोलवर गाडी चालू शकतात, त्यामुळे आता अफरोजच्या या जुगडाच मराठवाड्यात कौतुक होत आहे.
हेही वाचा :
नांदेडच्या शेतकऱ्याचा नाद खुळा, 35 हजारात तयार केली Electric Bike