औरंगाबाद : मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचे मालमत्ता कर रद्द केल्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. औरंगाबादमध्येही तेच दिसून येतंय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या आभाराचे आणि 'करून दाखवले' असे होर्डिंग्ज भाजपचे गटनेते, माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी शहरभर लावले आहेत. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून श्रेय घ्यायला सुरुवात झालीय. या होर्डिंगबाजीवर शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केलीय. विशेष म्हणजे भाजपाचे होर्डिंग्ज हे शिवसेना नेत्यांच्या बाजूला लावण्यात आले आहेत.


रेल्वे प्रश्नासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून पाठपुरावा केला जात असल्याचं खैरे सांगत आहेत. मात्र, मराठवाड्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रेल्वेचे प्रश्न भाजपने सोडवले असल्याचे होर्डिंग्ज औरंगाबाद शहरात भाजपाने लावले आहेत. त्यात रावसाहेब दानवे यांनी नांदेड - मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरणास मान्यता दिली, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जालन्यातून पहिली किसान रेल्वे सुरू केली आणि नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक डब्यांनी सज्ज अशी 'जालना- पुणे ट्रेन' सुरू केल्याचा मजकूर लिहिण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे होर्डिंग्ज शिवसेना नेत्यांच्या बाजूला लावण्यात आले आहेत. मात्र, हे होर्डिंग्स केलेल्या केलेल्या कामाचेच आहेत. इतरांसारखे बिनकामाचे होर्डिंग्जस लावत नाही. आम्ही काम केल्यानंतर बॅनरबाजी करतो, असं भाजप नेते सांगत आहेत.


इतर महत्वाचा बातम्या