औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील (Aurangabad Siddharth Zoo) पांढरी वाघिण अर्पिता (Arpita Tigress) हिने गुरुवारी (7 सप्टेंबर) रोजी सकाळी साडेसात ते दुपारी दोन वाजेपर्यंत तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला. अर्पिता वाघिण आणि बछड्यांची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी भेटीला आलेले महापालिका आयुक्त जी श्रीकांत (G Shrikant) यांनी यावेळी खजूर वाटून आनंद व्यक्त केला. 


बछडे आणि वाघिण यांची तब्येत सुदृढ आहे. बछडे आईचे दूध पिताना दिसून आलेले आहेत. वाघिण स्वतः बछड्याची निगा व काळजी घेत आहे. तसेच केअर टेकर मार्फत सुद्धा बच्छड्यांची देखभाल घेण्यात येत आहे. तसेच वाघिणीच्या आणि बच्छड्यांच्या 24 तास देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. 


वीर आणि अर्पिता (Arpita Tigress) या वाघांच्या जोडीमुळे या बछड्याचा जन्म झालेला आहे. आज जन्मलेल्या तीन बछड्यामुळे आता एकूण सहा पांढरे वाघ झाले आहेत अशी माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे.


Siddharth Garden and Zoo Aurangabad : आयुक्तांनी केली पाहणी


सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पांढरी वाघिन अर्पिता (Arpita Tigress) हिने आज सकाळी  तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिलेला आहे. यानिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत (G Shrikant) यांनी संध्याकाळी पाच वाजता प्राणी संग्रहालयास भेट दिली. तसेच अर्पिता आणि तिच्या बछड्यांबाबत विचारपूस केली. यावेळी वाघिण अर्पिता आणि तिच्या पिल्ल्यांची चांगली देखभाल केली आणि प्रसूतीच्या काळात काही अडचण न येता यशस्वीरित्या प्रसूती केल्याबद्दल मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन,  वाघांचे केअर टेकर मोहम्मद जिया आणि इतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.


Siddharth Garden and Zoo Aurangabad : खजूरने केले तोंड गोड 
 
यावेळी मनपा आयुक्तांनी हा आनंदाचा प्रसंग तोंड गोड करून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या गाडीत पेढ्यांचा डबा आहे का? असेल तर आणा असे निर्देश दिले. यावेळी त्यांना कळविण्यात आले की, त्यांच्या गाडीत खजूरचा एक डब्बा आहे. त्यामुळे त्यांनी तो डबा आणण्यासाठी सांगितले आणि सर्वांना खजूर वाटून करून तोंड गोड केले.


ही बातमी वाचा: