अटल 'तारा', अनोखा सन्मान! जयंतीनिमित्त ताऱ्याला अटल बिहारी वाजपेयींचं नाव
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल या समाधी स्थळावर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
Atal Bihari Vajpayee: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 98 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्ली येथं माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल या समाधी स्थळावर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. देशभरात अटल बिहारी वाजपेयी यांना आदराजंली अर्पण केली जात आहे. जयंतीनिमित्त तारामंडळातील एका ताऱ्याला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देत अनोखा सन्मान करण्यात आला आहे. याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या 98 व्या जयंती निमित्त त्यांचे नाव एका ताऱ्याला औरंगाबाद शहरच्या वतीनं देण्यात आले आहे . www.space-registry.org ह्या संकेतस्थळावर याची माहिती मिळू शकते. त्यासाठी संकेतस्थळावर तुम्हाला registry key No - CX16408US टाकावा लागेल, ही माहिती औरंगाबाद भाजप अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.
जब तक सुरज ,चांद रहेगा ,अटलजी आपका नाम रहेगा , ही अजरामर घोषणा औरंगाबाद भाजप शहराच्या वतीने देऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे एका तार्याचे नामकरण केले आहे. औरंगाबाद भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी याची माहिती दिली. ते म्हणाले की, औरंगाबाद शहर भाजपच्या वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती विविध कार्यक्रम करून साजरी करण्यात आली.
आज निनाद खोचे यांनी एका विशेष कार्यक्रमांतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अंतराळामध्ये एका तार्याचे नोंदणी केली. हा तारा पूर्व दिशेला सकाळी चार ते चार वाजून बारा मिनिटापर्यंत प्रखरतेने दिसतो. याचे पृथ्वीपासूनचे अंतर 392.01 प्रकाश वर्षे एवढे दूर आहे. हा तारा सूर्या जवळ आहे , या तार्याची नोंदणी इंटरनॅशनल स्पेस वर रजिस्ट्री केली आहे. या ताऱ्याची रजिस्ट्री नंबर हा CX16408 US हा आहे. याच पद्धतीने भारतामधील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावाने देखील आंतरराष्ट्रीय अंतराळामध्ये एका तार्याचे नामकरण झाले आहे.
2022/12/25/6f4c17aebc63d59238974c3b964c844d1671979319691265_original.jpg" />
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा देशाचं पतंप्रधानपद भूषवलं. 1996 मध्ये 13 दिवस, 1998 ते 1999 दरम्यान 13 महिन्यासाठी आणि 1999 ते 2004 दरम्यान पाच वर्ष ते प्रधानमंत्री म्हणून कार्यरत होते.