एक्स्प्लोर

औरंगाबाद जिल्हा परिषदेत विजयी चिठ्ठी काढणाऱ्या मुलाला पाचशे रुपयांची बक्षिसी

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना बंडखोर नेत्या देवयानी डोनगावकर आणि काँग्रेसच्या उमेदवार मीना शेळके यांच्यामध्ये खरी लढत होती. दोघींनाही ही 30-30 मतं पडली. आता काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये कायदेशीर पेच निर्माण झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या नाट्यावर दहा वर्षाच्या मुलाने पडदा टाकला. समर्थ मिटकर असा या मुलाचं नाव आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना बंडखोर नेत्या देवयानी डोनगावकर आणि काँग्रेसच्या उमेदवार मीना शेळके यांच्यामध्ये खरी लढत होती. दोघींनाही ही 30-30 मतं पडली. आता काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढून विजयी उमेदवारांची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दहा वर्षाच्या समर्थ मिटकरला बोलावण्यात आलं आणि त्याने मीना शेळके यांची चिठ्ठी काढली. मीना शेळके यांनी या मुलास पाचशे रुपये बक्षीस दिले तर चंद्रकांत खैरे यांनी त्या मुलाचा सत्कार केला. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. कारण, अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या किंबहुना काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदाची माळ भाजपच्या एल.जी. गायकवाड यांच्या गळ्यात पडलीय. त्यामुळं औरंगाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्ष काँग्रेसचा तर उपाध्यक्ष भाजपचा असं चित्र पाहायला मिळतंय. हेही वाचा- माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत; अब्दुल सत्तार यांचं घुमजाव अध्यक्षपदासाठी मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर आणि भाजप पुरस्कृत दिवयानी डोणगावकर यांना 30-30 अशी समान मतं मिळाली. पण चिठ्ठी काढून काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या गायकवाड यांना 32 तर महाविकास आघाडीच्या शुभांजी काजे यांना 28 मतं मिळाली आहेत. कोल्हापूर, नाशिकनंतर आता औरंगाबाद जिल्हा परिषद महाआघाडीने ताब्यात घेतली आहे. अब्दुल सत्तार यांच बंड शमलं - शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं होतं. राज्यमंत्रीपद दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. सोबत औरंगाबाद जिल्हा परिषद शिवसेनेकडे असावी, असंही त्यांचं म्हणणं होतं. मात्र, याठिकाणी काँग्रेचा उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हे नाराजी नाट्य संपलं असून अब्दुल सत्तार नाराज नसल्याचं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याची जबाबदारी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानुसार अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार राजीनामा देणार नाहीत, असं अर्जुन खोतकर यांनी बैठकीनंतर सांगितलं. औरंगाबाद जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेकडे ठेवावी यासाठी अब्दुल सत्तार आग्रही होते. मात्र, त्यांना स्थानिक नेत्यांनी काहीही विचारलं नाही, त्यामुळे सत्तारांची नाराजी होती.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत ट्विस्ट; काँग्रेसचा अध्यक्ष, तर भाजपचा उपाध्यक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Gunratan Sadavarte VIDEO : तुमची सगळी दादागिरी, पाटीलकी आता संपली, संजय पाटलांवर बोलताना सदावर्ते एकनाथ शिंदेंवर घसरले
तुमची सगळी दादागिरी, पाटीलकी आता संपली, संजय पाटलांवर बोलताना सदावर्ते एकनाथ शिंदेंवर घसरले
पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण! टीकेची झोड उठताच संजय दिना पाटील नरमले, जाहीर दिलगिरी व्यक्त 
पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण! टीकेची झोड उठताच संजय दिना पाटील नरमले, जाहीर दिलगिरी व्यक्त 
मुंबई उच्च न्यायालयाकडून 'जॅम मिल'च्या रहिवाशांना संरक्षण, अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात 
मुंबई उच्च न्यायालयाकडून 'जॅम मिल'च्या रहिवाशांना संरक्षण, अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात 
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही, रोहित पवारांना विश्वास, संजय दिना पाटलांवरही टीका 
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही, रोहित पवारांना विश्वास, संजय दिना पाटलांवरही टीका 

व्हिडीओ

Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Passport Fee : पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
Dharashiv : शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 
शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
Embed widget